ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जींवर हल्ला नव्हे अपघात; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

दहा मार्चला नंदीग्रामध्ये प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. ही घटना हल्ला नसून, केवळ अपघात असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे...

author img

By

Published : Mar 14, 2021, 3:11 PM IST

ec-rules-out-attack-on-cm-mamata-banerjee
ममता बॅनर्जींवर हल्ला नव्हे अपघात; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने रविवारी ममता बॅनर्जींवर हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले. राज्याचे निरीक्षक आणि मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालावरुन हा निर्णय घेण्यात आला.

राज्य मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय, विशेष निरीक्षक अजय नायक आणि विशेष पोलीस निरीक्षक विवेक दुबे यांनी बंगाल सरकारने दिलेली माहिती तपासली. या अहवालामध्ये पुरेशी माहिती नसल्याचा निर्वाळा या तिघांच्या समितीने दिला. राज्य सरकारने दिलेल्या माहितीमध्ये हा हल्ला कसा झाला, आणि यामागे कोणाचा हात होता याबाबत पुरेसे स्पष्टीकरण उपलब्ध नव्हते. तसेच, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

हल्ला नाही, अपघात..

दहा मार्चला नंदीग्रामध्ये प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. ही घटना हल्ला नसून, केवळ अपघात असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे.

हल्ल्यावरुन आरोप-प्रत्यारोप..

दीदींवरील हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. तर भाजपाच्या एका शिष्टमंडळाने भारतीय निवडणूक आयोगाची भेट घेत, कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच हा हल्ला नौंटकी असल्याचे काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं.

या दुर्घटनेनंतर ममतांवर कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर आजपासून ममता बॅनर्जी या व्हीलचेअरवरुन आपला प्रचार करत आहेत. बंगालमध्ये २७ मार्चपासून आठ टप्प्यांमध्ये निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. २ मे रोजी या निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा : दीदींना आव्हान देणाऱ्या सुवेंदु अधिकारींची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रात माहिती उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.