ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : ममतांचे केंद्रीय दलांवरील आरोप चुकीचे; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Apr 4, 2021, 5:32 PM IST

नंदीग्राम विधानसभा क्षेत्रातील बुथ क्रमांक 7 वर गोंधळ उडाल्याची तक्रार ममता यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ममतांच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या पत्रात लिहिलेल्या गोष्टीत वस्तुस्थिती नाहीत. 1 एप्रिल रोजी नंदीग्राममध्ये मतदान प्रकियेत व्यत्यय आला नाही. बीएसएफ जवानांवरील आरोप पूर्णपणे खोटे आहेत. मतदारांचा धमकी देण्याचा आरोप चुकीचे आहेत, असे ममता यांना पाठवलेल्या उत्तरात आयोगाने म्हटलं.

ममता
ममता

कोलकाता - बंगाल निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. नंदीग्राममधील बुथ क्रमांक 7 येथे शांततेत मतदान पार पडले. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही, असे आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे. "तुमच्या पत्रात लिहिलेल्या गोष्टीत वस्तुस्थिती नाहीत. 1 एप्रिल रोजी नंदीग्राममध्ये मतदान प्रकियेत व्यत्यय आला नाही. बीएसएफ जवानांवरील आरोप पूर्णपणे खोटे आहेत. मतदारांचा धमकी देण्याचा आरोप चुकीचे आहेत, असे ममता यांना पाठवलेल्या उत्तरात आयोगाने म्हटलं.

ec-reply-to-mamata-banerjee-on-nandigram
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया

नंदीग्राम विधानसभा क्षेत्रातील बुथ क्रमांक 7 वर गोंधळ उडाल्याची तक्रार ममता यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ममतांच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील सविस्तर अहवाल शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता विशेष निरीक्षक अजय नायक आणि पोलीस निरीक्षक विवेक दुबे यांनी सादर केला. अहवालानुसार कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नसल्याचे समोर आले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटलं.

बंगाल विधानसभेच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुका गुरुवारी पार पडल्या. भाजपाला मतदान करण्यासाठी मतदारांना केंद्रीय सुरक्षा दलांनी धमकवल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. निवडणूक आयोगाकडे 63 तक्रारी दाखल झाल्या आहेत. आयोग त्यांना गांभीर्याने घेत नसल्याचेही ममता यांनी म्हटलं होते. केवळ भाजपाच्या लोकांना मदत करण्याचे निर्देश गृह मंत्री अमित शाह यांनी सीआरपीएफ, बीएसएफ आणि इतर जवानांना दिल्याचे बॅनर्जी यांनी म्हटलं होते.

हेही वाचा - बीजापूर चकमक LIVE Updates : हुतात्मा जवानांची संख्या २२ वर, राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.