गुटखा, तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान यांचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. देशाच्या लोकसंख्येच्या 28.6 टक्के म्हणजेच प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्ती धूरविरहित तंबाखूचे सेवन करते. तर दर 10 पैकी 1 व्यक्ती धूम्रपान करतो. तंबाखूचे सेवन करणाऱ्यांपैकी 50 टक्के लोकांचा यामुळे मृत्यू होतो. तंबाखू खरेदी करताना त्याच्या पाकिटावरही तंबाखू न खाण्याचा सल्ला दिला जातो. तंबाखू आणि गुटख्यामुळे दात काळे आणि पिवळे पडतात.
व्यसनामुळे होणारे आजार (Diseases caused by addiction): संपूर्ण कार्डियोवस्कुलर सिस्टम (cardiovascular system) म्हणजेच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली प्रभावित करते ज्यात हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्यांचा समावेश आहे. धूम्रपान शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे फुफ्फुसाचे आजार, कर्करोग, पक्षाघात, हृदयविकार, मधुमेह आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांचा धोका वाढतो.
घरगुती उपाय: तंबाखू हानिकारक आहे हे लोकांना माहीत असते. मात्र इच्छा असूनही ते हे व्यसन सोडू शकत नाहीत. धुम्रपानाच्या सवयीमुळे काही काळ सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन न केल्याने त्यांना चिंता वाटू लागते. मानसिकदृष्ट्या त्यांना धूम्रपान करण्याची गरज वाटू लागते. त्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
बडीशेपचे सेवन: जर तुम्हाला धूम्रपानाची सवय सोडायची असेल, पण व्यसनामुळे तुम्ही तंबाखू गुटखा खाणे सोडू शकत नसाल, बडीशेपचे सेवन करा. प्रत्येक घरात वापरलेली बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे वैद्यकीय गुणधर्म सर्वात वेगळे आहेत. बडीशेप कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. यात अॅनिथोल नावाचे अँटी-इंफ्लेमेटरी फाइटोनट्रिएंट्स असल्याने कर्करोग रोखण्यास मदत होते. या व्यतिरिक्त स्तन कर्करोगाच्या (Cancer) पेशींमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
ओव्याचे सेवन: जर तुम्हाला धूम्रपानाची सवय सोडायची असेल, पण व्यसनामुळे तुम्ही तंबाखू गुटखा खाणे सोडू शकत नसाल, तर ओव्याचे सेवन करा. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा येते तेव्हा तोंडात थोडेसे ओव्याचे दाणे टाका.
गुटख्यामुळे दात काळे आणि पिवळे पडतात: तंबाखू खरेदी करताना त्याच्या पाकिटावरही तंबाखू न खाण्याचा सल्ला दिला जातो.तंबाखू आणि गुटख्यामुळे दात काळे आणि पिवळे पडतात. दातांवरील हे डाग साफ करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड आणि बेकिंग सोडा वापरा.
दातांवरील काळेपणा दूर करण्यासाठी उपाय (Remedies to remove stain on teeth): गुटखा आणि तंबाखूच्या सेवनामुळे दातांवरील काळेपणा दूर करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड आणि बेकिंग सोडा दोन्ही मिसळून दात घासता येतात.यामुळे दातांवर दिसणारा काळेपणा लगेच दूर होतो.याशिवाय टूथपेस्टवर लावूनही याचा वापर करू शकता. काही दिवस वापरल्यानंतर दात चमकदार होतील.