ETV Bharat / bharat

India China Military Talks : वादाच्या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत चीनमध्ये चर्चेची 16 फेरी - LAC

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( LAC ) उरलेल्या उरलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत चीन आज (रविवारी) उच्चस्तरीय लष्करी चर्चेची ( India China Military Talks ) 16 वी फेरी होणार आहे.

India China Military Talks
India China Military Talks
author img

By

Published : Jul 17, 2022, 12:03 PM IST

Updated : Jul 17, 2022, 12:23 PM IST

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( LAC ) उरलेल्या उरलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन रविवारी उच्चस्तरीय लष्करी चर्चेची 16 वी बैठक ( India China Military Talks ) होणार आहे. ही बैठक LAC च्या भारतीय बाजूच्या चोशुल मोल्डो बैठकीच्या ठिकाणी होणार आहे. यापूर्वी 11 मार्च रोजी भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यात चर्चा झाली होती. चर्चेच्या नवीन टप्प्यात, जिथे अजूनही गतिरोध कायम आहे अशा सर्व ठिकाणांहून सैन्य लवकर माघारी घेण्याचा भारत आग्रह धरू शकतो. याशिवाय देपसांग बुलगे आणि डेमचोक येथील प्रश्न सोडविण्यासाठी ते आग्रही राहू शकतात.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांनी 7 जुलै रोजी बाली येथे पूर्व लडाखमधील परिस्थितीवर चर्चा केली. जी 20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या बाजूला तासभर चाललेल्या बैठकीत जयशंकर यांनी पूर्व लडाखमधील सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज वांग यांना सांगितली होती. परराष्ट्र मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी काही भागांतून सैन्य मागे घेण्याचा संदर्भ देताना, उर्वरित सर्व भागातून पूर्णपणे माघार घेण्यासाठी ही गती कायम राखणे आवश्यक आहे यावर भर दिला. सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी याची गरज आहे.

चर्चेचे गुऱ्हाळ - सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यापूर्वीची बैठक 11 मार्च 2022 (शुक्रवारी) रोजी झाली होती. या बैठकीत प्रामुख्याने सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा करण्यात आली होती. भारतीय हद्दीतील चुशुल मोल्डो मीटिंग पॉइंटमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची ही 15 वी फेरी पार पडली होती. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्याआदीही दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या 14 फेऱ्या झाल्या होत्या, परंतु तोडगा अद्याप निघालेला नाही.

गलवान व्हॅली, दक्षिणी किनाऱ्यावर सहमती - याआधी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी पॅंगॉन्ग सो लेक, गलवान व्हॅली आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सच्या उत्तर आणि दक्षिणी किनार्‍यावर सहमती दर्शवली आहे. उरलेल्या समस्या सोडवण्याबाबत 15 फेरीत चर्चा झाली होती. परंतु तोडगा निघू शकला नव्हता. आज होणाऱ्या चर्चेच्या 16 फेरीतही दोन्ही बाजू परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी चर्चा करतील. विशेष म्हणजे, दोन्ही देशांची अलीकडील विधानेही या सकारात्मक समाधानावर केंद्रित होती.

गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीमेवर शांतता प्रस्थापीत करण्यासाठी दोन्ही देशांनी पाऊल पुढे टाकवे. तसेच सीमा नियमांचे पालन करावे आणि सीमाभागातील शांती भंग होणार नाही, याची काळजी एकत्रितपणे घ्यावी, यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे.

हेही वाचा - Indigo Emergency landing In Karachi : इंडिगोचे विमान कराचीत उतरविले, इंजिनमध्ये झाला बिघाड

Last Updated : Jul 17, 2022, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.