ETV Bharat / bharat

Earthquake in Philippines - उत्तर फिलीपिन्समध्ये 7.0 रिश्टर स्केलचा भूकंप, इमारतींना नुकसान - Earthquake in north Philippines

बुधवारी उत्तर फिलीपिन्सला जोरदार भूकंपाचा ( Earthquake in north Philippines ) धक्का बसला, ज्यामुळे काही नुकसान झाले. भूकंपामुळे लोकांनी राजधानीतील इमारती सोडल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंप 7.3 रिश्टर स्केलवर भूकंपाची तिव्रता 7.3 इतकी होती

Earthquake in north Philippines
फिलीपिन्स जोरदार भूकंप
author img

By

Published : Jul 27, 2022, 9:55 AM IST

मनीला (फिलीपन्स) - बुधवारी उत्तर फिलीपिन्सला जोरदार ( Earthquake in north Philippines ) भूकंपाचा धक्का बसला, ज्यामुळे काही नुकसान झाले. भूकंपामुळे लोकांनी राजधानीतील इमारती सोडल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंप 7.3 रिश्टर स्केलवर भूकंपाची तिव्रता 7.3 इतकी होती व अब्रा प्रांताभोवती डोंगराळ भाग हा त्याचा केंद्र होता. भूकंपाचे अनेक धक्के जाणवले अशी माहिती फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मोलॉजी यांनी सांगितली.

फिलीपिन्समधील दृश्य

हेही वाचा - Cryptocurrency Prices 27 July 2022 : बिटकॉईनच्या दरात मोठी घट, 'या' क्रिप्टोकरन्सीच्या दरात वाढ

25 कि.मी खोल आतमध्ये जमिनीतील भेगामध्ये हालचाल झाल्याने हा भूकंप आल्याचे फिलीपिन्स इन्स्टिट्यूटने सांगितले. तसेच, भूकंपाच्या जोरदार हादऱ्यांमुळे इमराती आणि घरांना तडे गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यू.एस भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची तिव्रता मोजली असून ती 7.0 इतकी होती. अधिका-यांनी सांगितले की जोरदार हादरल्यामुळे इमारती आणि घरांना तडे गेले. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची ताकद ७.० आणि खोली १० किलोमीटर (६ मैल) मोजली. उथळ भूकंपांमुळे अधिक नुकसान होते.

फिलीपिन्स हे पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या बाजूने आहे. हे पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या जमिनीतील तड्यांचा (Fault) एक चाप (Arc) आहे जिथे जगातील बहुतांश भूकंप होतात. या देशात दरवर्षी सुमारे 20 टायफून आणि उष्णकटिबंधीय वादळे देखील येतात, त्यामुळे हे जगातील सर्वात आपत्ती-प्रवण देशांपैकी एक बनले आहे. 1990 मध्ये उत्तर फिलीपिन्समध्ये 7.7 तीव्रतेच्या भूकंपात सुमारे 2,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - TODAYS GOLD SILVER RATES : सोने चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजची किंमत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.