ETV Bharat / bharat

Earthquake tremors in North India : नेपाळ, दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के - दिल्ली सचिवालयात चेंगराचेंगरी

Earthquake tremors in North India : दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. सुमारे 10 सेकंदांपर्यंत हे धक्के जाणवले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. उत्तर भारतात इतरही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, मंगळवारी नेपाळमध्ये दोन भूकंप आले. पहिला भूकंप 4.6 रिश्टर स्केलचा होता, तर दुसरा भूकंपाचा झटका ६.२ रिश्टर स्केलचा होता.

Earthquake tremors in North India
Earthquake tremors in North India
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 4:40 PM IST

नवी दिल्ली : मंगळवारी दुपारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे इमारती आणि जमीन हादरल्यानं काही लोक सुरक्षिततेसाठी घरातून बाहेर पळाले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की मंगळवारी नेपाळमध्ये दोन भूकंप आले. यातील पहिला भूकंप 4.6 रिश्टर स्केलचा होता. दुपारी 2:25 वाजता नेपाळमध्ये या भूकंपाचं झटके जाणवले. दुसरा भू कंप रिश्टर स्केलवर 6.2 मोजला गेला. हा झटका दुपारी 2:51 वाजता बसला.

  • दिल्ली-एनसीआर में भूकंप के झटके महसूस किए गए। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/g9NFaE6nPl

    — ANI_HindiNews (@AHindinews) October 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भूकंपाचा इतर तपशील देताना सिस्मालॉजीच्या अधिकाऱ्यांनी एक्स, पूर्वीच्या ट्विटवरुन सांगितलं की, "तीव्रता भूकंप: ४.६, ०३-१०-२०२३ रोजी, १४:२५:५२ IST, अक्षांश: २९.३७ आणि रेखांश: ८१.२२, खोली : १० किमी, स्थान: नेपाळ,". राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने अशा प्रकारे ट्विटमध्ये माहिती देताना म्हटले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ट्विटमध्ये "तीव्रता भूकंप: 6.2, 03-10-2023 रोजी झाला, 14:51:04 IST, अक्षांश: 29.39 आणि रेखांश: 81.23, खोली: 5 किमी, स्थान: नेपाळ," असं म्हटले आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवल्याचं तेथील रहिवाशांनी सांगितलं. सुमारे 10 सेकंदांपर्यंत हे धक्के जाणवले असल्याचं सांगण्यात आलं.. मात्र, अद्याप कुठलीही हानी झाल्याचं वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर होता. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती.

नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, नेपाळमध्ये दुपारी २:५१ वाजता हा भूकंप झाला. भूकंपानंतर लोकांमध्ये घबराट पसरली. ऑफिस आणि घरातून लोक बाहेर पळाले. दिल्लीबरोबरच उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि उत्तराखंडमध्येही हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धोक्याच्या बाबतीत राजधानी दिल्ली दुसऱ्या सर्वात धोकादायक झोनमध्ये येते. यामुळेच यमुनेच्या वालुकामय जमिनीवर वसलेला भाग उंच इमारतींसाठी सुरक्षित नाही, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

दिल्ली सचिवालयात चेंगराचेंगरी : भूकंपाचे धक्के जाणवताच दिल्ली सचिवालयात चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही लोक धोका ओळखून टेबलसारख्या फर्निचरखाली बसले तर काही कोपऱ्यात उभे राहिले. तसंच, बहुतेक लोक बाहेर पळत होते. लखनऊ आणि उत्तराखंडमध्येही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती दिसून आली.

  • #WATCH | Uttarakhand | People rushed out of their buildings in Dehradun as strong tremors were felt in different parts of north India. Visuals from the Secretariat.

    As per National Centre for Seismology, an earthquake with a magnitude of 6.2 on the Richter Scale hit Nepal at… pic.twitter.com/Cz7gczdMbr

    — ANI (@ANI) October 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धक्का जाणवला नाही : ईटीव्ही भारतशी बोलताना लोकांनी सांगितले की, हा इतका जोरदार धक्का नव्हता. थोडेसे भूकंप झाल्यासारखे वाटले. प्रिन्स कुमारने सांगितले की, तो नुकताच कॅन्टीनमधून जेवण करून बाहेर पडला होता. मला अचानक घरून फोन आल्यावर कळलं. ऋषभदेवने सांगितले की, तो बाईक चालवत होता. त्याला काही जाणवलं नाही. नंतर मोबाईल बघितल्यावर मेसेज वाचून भूकंपाचे धक्के बसल्याचं समजलं.

  • #WATCH | Delhi: People rush out of the office building as strong tremors of earthquake were felt across North India.

    Visuals from outside the Asian News International (ANI) office in RK Puram sector 9. pic.twitter.com/wX1fyutNvp

हेही वाचा...

  1. Earthquake in Manipur : मणिपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; मोरोक्कोमध्ये भूकंपाने 2800 जणांचा मृत्यू
  2. Morocco Earthquake : मोरोक्कोच्या भूकंपातील मृतांची संख्या २००० पार, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
  3. Chandrayaan 3 update : चंद्रावर भूकंप! इस्रोनं नोंदवलं 'कंपनं', प्लाझमाचा अभ्यास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.