ETV Bharat / bharat

Earthquake In Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट - दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जानवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, असेच पंजाब, उत्तराखंड, राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री 10.15 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake In Delhi
Earthquake In Delhi
author img

By

Published : Mar 21, 2023, 10:57 PM IST

Updated : Mar 21, 2023, 11:07 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जानवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, असेच पंजाब, उत्तराखंड, राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री 10.15 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

रुद्रप्रयाग : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये काल संध्याकाळी भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे रुद्रप्रयागमधील लोकांमध्ये घबराट पसरली असून घाबरून लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 2.1 रिश्टर स्केल एवढी होती. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप नाही.

  • #WATCH | Uttar Pradesh: People rush out of their houses to open spaces as several parts of north India experience strong tremors of earthquake.

    Visuals from Golf City, Noida. pic.twitter.com/Y5GmK1Ck2S

    — ANI (@ANI) March 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री भूकंप : कालपासून उत्तराखंडमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वी उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री एकापाठोपाठ एक भूकंपाचे पाच धक्के बसल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी गेले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. प्रशासनाने लाऊडस्पीकरद्वारे लोकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

भूकंपाने जुन्या आठवणींना उजाळा दिला : 1991 मध्ये उत्तरकाशी आणि 1999 मध्ये चमोली येथे 7 तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपादरम्यान झालेला विध्वंस आजही लोकांच्या मनात ताजा आहे. त्यावेळी उत्तरकाशीमध्ये सुमारे ७६८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर पाच हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. या आपत्तीत तब्बल वीस हजारांहून अधिक लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते. मध्यरात्री आलेल्या या भूकंपात लोकांना काही समजण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना आपल्या कवेत घेतले होते. १९९१ पासून येथे अद्याप मोठा भूकंप झालेला नाही. मोठा भूकंप झाला तर अधिक नुकसान होऊ शकते, असे लोकांचे म्हणणे आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात? : भूवैज्ञानिक डॉ. सुशील कुमार म्हणतात की, भूकंपाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण हिमालयीन प्रदेश अत्यंत संवेदनशील आहे. येथे दररोज 2 ते 5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप येत असतात. यूरेशियन प्लेटच्या दिशेने भारतीय प्लेटच्या सतत हालचालीमुळे भूगर्भीय हालचाली वाढल्या आहेत. 1991 पासून, उत्तरकाशी प्रदेशात 70 हून अधिक किरकोळ भूकंप झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक भूकंपाचे धक्के 2017 (13) मध्ये जाणवले. गेल्या वर्षी 24 जुलैलाही एकापाठोपाठ एक भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 मोजण्यात आली होती.

Last Updated : Mar 21, 2023, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.