नवी दिल्ली : दिल्ली - एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी रात्री 9.34 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू - काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले.
-
Earthquake of magnitude 5.8 on the Richter scale originated in Afghanistan, tremors felt in Delhi. pic.twitter.com/55YeDpajjz
— ANI (@ANI) August 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Earthquake of magnitude 5.8 on the Richter scale originated in Afghanistan, tremors felt in Delhi. pic.twitter.com/55YeDpajjz
— ANI (@ANI) August 5, 2023Earthquake of magnitude 5.8 on the Richter scale originated in Afghanistan, tremors felt in Delhi. pic.twitter.com/55YeDpajjz
— ANI (@ANI) August 5, 2023
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात धक्के जाणवले : दिल्ली, नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम, गाझियाबादसह आसपासच्या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या सोबतच उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही भागांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. भूकंपाचे हादरे फार तीव्र नव्हते, मात्र भूकंप झाला आहे असे जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. भूकंपाची बातमी ऐकून मनात भीती निर्माण झाल्याचेही लोकांनी सांगितले.
-
An earthquake of 5.8 magnitude hit Afghanistan's Hindu Kush region earlier today, tweets National Center for Seismology. Tremors were felt in Delhi-NCR and nearby regions. pic.twitter.com/GiLAlNANFV
— Press Trust of India (@PTI_News) August 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An earthquake of 5.8 magnitude hit Afghanistan's Hindu Kush region earlier today, tweets National Center for Seismology. Tremors were felt in Delhi-NCR and nearby regions. pic.twitter.com/GiLAlNANFV
— Press Trust of India (@PTI_News) August 5, 2023An earthquake of 5.8 magnitude hit Afghanistan's Hindu Kush region earlier today, tweets National Center for Seismology. Tremors were felt in Delhi-NCR and nearby regions. pic.twitter.com/GiLAlNANFV
— Press Trust of India (@PTI_News) August 5, 2023
मी घरात टीव्ही पाहत होतो. तेव्हा अचानक खुर्ची हलू लागली. पण हा भूकंप होता हे मला कळले नाही. बातमीत पाहिल्यानंतर कळले की दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यानंतर मी घाबरून घराबाहेर पडलो. - स्थानिक नागरिक
जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही : भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्र हिंदुकुशमध्ये असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत या तिन्ही देशांमध्ये त्याचे हादरे जाणवले आहेत. जुलै महिन्यातही जम्मू - काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भूकंप का होतात? : भूकंपाचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांच्या मते, हिमालयीन प्रदेशातील भारतीय प्लेट दरवर्षी 40 ते 50 मिमीने सरकत आहे, म्हणजेच ती हलत आहे. जेव्हा दोन किंवा अधिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा प्लेट्समध्ये घर्षण होते, तेव्हा त्या भागात तणाव निर्माण होतो. त्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवतात.
हे ही वाचा :