ETV Bharat / bharat

Earthquake in Manipur : मणिपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; मोरोक्कोमध्ये भूकंपाने 2800 जणांचा मृत्यू - मोरोक्कोमध्ये भूकंपाने 2800 जणांचा मृत्यू

Earthquake in Manipur : ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता 5.1 इतकी मोजली गेली. या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. तर दुसरीकडे मोरोक्कोमध्ये भूकंपाने 2800 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे.

Etv Bharat
भूकंप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 8:33 AM IST

उखरुल : Earthquake in Manipur : मणिपूरमध्ये सोमवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.1 इतकी मोजली गेली. या आपत्तीमुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. भूकंपानंतर लोक घाबरले होते. भूकंपाचा हादरा बसल्यानंतर नागरिकांनी आपले घर सोडून रस्त्यावर येऊन थांबल्याचे चित्र पाहायला मिळत होतं.

मणिपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सोमवारी रात्री ११.१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NSC) नुसार, 5.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंप जमिनीपासून 20 किमी खोलीवर झाला. याआधी बंगालच्या उपसागरात सोमवारी पहाटे ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपाची 70 किलोमीटर खोलीवर नोंद झाली आहे.

मोरोक्कोमध्ये भूकंपाने 2800 जणांचा मृत्यू : मोरोक्कोमध्ये ८ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजता विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपात आतापर्यंत 2800 हून अधिक लोकांचा मृत्यू (Morocco Earthquake Death) झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी देखील झाले आहेत. अडीच हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. मोरोक्कोमधील सर्व जनजीवन सध्या विस्कळित झालं आहे. तसेच आताही या भागात बचाव व मदतकार्य सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅटलस पर्वताच्या खोऱ्यात वसलेल्या गावांमध्ये या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोठे दगड फुटून खाली आले, त्यामुळे गावाचे मोठे नुकसान झाले. या भागात मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. याआधी तुर्कियेला विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला होता.

तुर्किये येथे भूकंपाचे धक्के : 6 फेब्रुवारी रोजी तुर्किये येथे विनाशकारी भूकंप झाला होता. भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने तुर्की शहर उध्वस्त झाले होते. येथे सर्वाधिक ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या घटनेत ४५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे 104 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -

  1. Chandrapur Earthquake : भूमिगत कोळसा खाणीने वेढलेल्या चंद्रपूर शहरावर भूकंपाचे सावट? काय आहे आताची स्थिती?
  2. Morocco Earthquake : मोरोक्कोच्या भूकंपातील मृतांची संख्या २८०० पार, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.