कुड्डालोर (तामिळनाडू): Drunken Man Died by Snakebite: तामिळनाडूमध्ये नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनेकांनी दारू घेत नववर्ष साजरे केले. त्याचवेळी एका दारुड्याने नशेमध्ये चक्क रस्त्याने जात असलेला साप स्वतःच्या हाताने Drunken Man Caught a snake playfully पकडला. मित्रांना तो साप दाखवत असताना सापाने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मणिकंदन (उर्फ) अप्पू, कुड्डालोर जिल्ह्यातील Kuddalore of Tamil Nadu तिरुपाथित्रिपुलियुरच्या सुबरायण नगर भागातील लॉन्ड्री कामगार. काल रात्री (दि. 31) नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये तो सहभागी होता. आणि तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्याला एक साप जाताना दिसला, त्याने तो पकडला आणि आपल्या मित्रांना नवीन वर्षाची भेट म्हणून दाखवला.
हे पाहून त्याचे मित्र आणि काही लोक घाबरून पळून गेले आणि डोळ्याचे पारणे फेडून सगळे हे पाहत असताना त्याला साप चावला. तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध झालेल्या मणिकंदनला सापासोबत कुड्डालोरच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात नेत असतानाच मणिकंदनचा मृत्यू झाला.
तो साप त्याने सरकारी रुग्णालयात आणला तेव्हा तो रसेलचा भयानक विष असलेला साप असल्याचे उघड झाले. जेव्हा मणिकंदन घेऊन आलेल्या व्यक्तीलाही साप चावला होता. त्याच्यासोबत असलेल्या कपिलनवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधील लोकांनी सापाला मारले. विषारी रसेलचा वायपर साप पकडून आपल्या मित्रांना नवीन वर्षाची भेट म्हणून देणाऱ्या एका व्यक्तीचा याच सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याने त्याच्या परिसरात शोककळा पसरली आहे.