हैदराबाद : हैदराबादमधील एसआर नगरमध्ये सात कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन ड्रायव्हर फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली आहे.
ड्रायव्हरनेच केली चोरी : माहितीनुसार, मादापूर येथे राहणारी राधिका दागिन्यांचा व्यवसाय करते. ती आघाडीच्या दागिन्यांच्या दुकानातून ग्राहकांना हिरे आणि सोन्याचे दागिने पुरवते. श्रीनिवास नावाचा एक व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून तिच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला कधीकधी ग्राहकांच्या ऑर्डर देण्यासाठी पाठवायची. अशाप्रकारे दागिन्यांवर नजर ठेवणाऱ्या श्रीनिवासने दागिने चोरण्याचा कट रचला. दागिने चोरण्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत होता.
सात कोटी किमतीचे दागिने चोरले : शुक्रवारी राधिकाच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अनुषा या ग्राहकाने ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने मागवले. दागिन्यांच्या डिलिव्हरीच्या वेळी अनुषा घरी नव्हती. ती मधुरानगर येथे नातेवाईकाच्या घरी होती. तिने राधिकाला दागिने तिथे पाठवायला सांगितले. त्यानंतर राधिकाने ड्रायव्हर श्रीनिवास आणि सेल्समन अक्षयसोबत सात कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने तिला पाठवले.
सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल : मधुरानगर येथील अनुषाच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचल्यानंतर ड्रायव्हर श्रीनिवासने आपला बेत अंमलात आणला. आधीच्या योजनेनुसार त्याने अक्षयला ऑर्डर देण्यासाठी घरात पाठवले. अक्षय ग्राहकाला दागिने देत होता. कारमध्ये थांबलेला ड्रायव्हर श्रीनिवास सात कोटी रुपयांचे उरलेले दागिने घेऊन फरार झाला. राधिकाला ही बाब अक्षयच्या माध्यमातून कळली आणि तिने तत्काळ एसआर नगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ड्रायव्हरने चोरलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे सात कोटी रुपये असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
हैदराबादमध्ये दहशतवाद्याला अटक : हैदराबादमध्ये गेल्या वर्षी दसरा उत्सवादरम्यान साखळी बॉम्बस्फोट घडवून दहशतवादी कट रचल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या हैदराबाद मधील मोहम्मद अब्दुल कलीम उर्फ अर्शद खान (३९) याला सीसीएस आणि सीआयटी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी त्याची रवानगी चंचलगुडा कारागृहात केली. या प्रकरणाशी संबंधित दोन जणांचा शोध अद्याप सुरू आहे.
हेही वाचा : FIR On Ajay Rai : कॉंग्रेस नेते अजय राय यांच्यावर गुन्हा दाखल, राहुल गांधींच्या विमानावरील वक्तव्य भोवलं