भुवनेश्वर - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विस्तारित क्षेत्रात रॉकेट्सचा मारा करणाऱ्या स्वदेशी पिनाकाची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही चाचणी ओडिशाच्या समुद्रकिनारी असलेल्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये (आयटीआर) घेण्यात आली आहे.
१२२ एमएमचे कॅलिबर रॉकेट्स हे मल्टी बॅरल रॉकेट लाँचरमध्ये (एमबीआरएल) लाँच केले आहे. मोहिमेतील सर्व उद्दिष्ट हे पार पडली आहे. विस्तारित अंतरावरील टप्प्यातील पिनाका रॉकेट सिस्टिममध्ये ४५ किमीपर्यंत टार्गेट उद्धवस्त करता येते.
हेही वाचा-बिहारच्या एसटीईटी परीक्षेच्या निकालात मल्याळम अभिनेत्रीचा फोटो, स्कोअरचा व्हिडिओ व्हायरल
दोन संस्थांच्या मदतीने पिनाकााचे वाढले विकसित-
हे रॉकेट यंत्रणा पुण्यातील अर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅबिलिशमेंटन (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरटरीने (एचईएमआरएल) विकसित केली आहे. त्यासाठी नागपूरच्या इकॉनॉमिक एक्सप्लॉझिव्हने उत्पादन सहकार्य केले आहे. अधिक टप्प्यावर मारा करण्याचे सामर्थ्य वाढविण्यासाठी पिनाका यंत्रणा अधिक विकसित केल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-धक्कादायक! मास्क न घातल्याने सुरक्षा रक्षकाने ग्राहकावर झाडली गोळी!
केंद्रीय मंत्र्यांनी डीआरडीओ टीमचे केले अभिनंदन-
अद्ययावत पिनाका रॉकेटचे यशस्वी लाँचिंग झाल्याने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि उद्योगाचे अभिनंदन केले आहे. डीआरडीओचे चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी रॉकेटची प्रायोगिक चाचणी यशस्वी घेण्यासाठी परिश्रम घेतलेल्या टीमचे अभिनंदन केले.
पिनाकरिता वापरण्यात आले आहे स्वदेशी तंत्रज्ञान-
पिनाका लाँचिंग यंत्रणा ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केली आहे. पिनाका डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑरगायनेझशन ही एल अँड टीच्या मालकीची आहे. या कंपनीने तयार केलेल्या पिनाका यंत्रणेत सर्व वातावरणात वापरण्यात येऊ शकणारे उच्च तंत्रज्ञान आहे. यापूर्वी पिनाका यंत्रणा ही संरक्षण मंत्रालयाच्या ऑर्डरनंतर दोन रेजिमेंटला दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.