ETV Bharat / bharat

थेट इंग्लंडहून विशेष मुलाखत : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काय म्हणाले डॉ. संग्राम पाटील? - Dr sangram patil england

तिसऱ्या लाटेबाबत अनेक तज्ञांनी भाकित केलं आहे. मी राहत असलेल्या ब्रिटनमध्ये तिसरी लाट ओसरत आहे. अमेरिकेत तिसरी लाट सुरू झालेली आहे. भारतातील परिस्थिती पाहता लसीकरण तिथे लसीकरण कमी झालेले आहे. आयसीएमआरच्या मते, सीरोपॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या 68 टक्के आहे, असे असताना उरलेल्या लोकांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता आहे.

डॉ. संग्राम पाटील
डॉ. संग्राम पाटील
author img

By

Published : Aug 25, 2021, 1:24 PM IST

Updated : Aug 25, 2021, 4:52 PM IST

हैदराबाद - गेल्या दीडवर्षांपेक्षा अधिक काळ होत आहे. कोरोनाच्या महासंकटाने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातलं. या सर्व काळात सुरुवातीला पहिली लाट आणि त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेचा आपल्याला मोठा फटका बसला. आता तिसऱ्या लाटेचा सुद्धा इशारा अनेक तज्ञांनी दिलाय. भविष्यातील कोरोनाची तिसरी लाट पाहता चित्र कसं राहील? यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? नवीन आलेला डेल्टा व्हायरस हा प्रकार नेमका काय आहे? आणखी काय काळजी घ्यायला हवी? यासर्व प्रश्नांवर ईटीव्ही भारतने इंग्लंडमधील संसर्गजन्य रोगतज्ञ डॉ. संग्राम पाटील यांच्याशी विशेष मुलाखत घेतली. वाचा, ही सविस्तर मुलाखत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काय म्हणाले डॉ. संग्राम पाटील?

प्रश्न - डॉ. अनेक तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तिसरी लाट येणार का? तिची तीव्रता किती असणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं?

उत्तर - तिसऱ्या लाटेबाबत अनेक तज्ञांनी भाकित केलं आहे. मी राहत असलेल्या ब्रिटनमध्ये तिसरी लाट ओसरत आहे. अमेरिकेत तिसरी लाट सुरू झालेली आहे. भारतातील परिस्थिती पाहता लसीकरण तिथे लसीकरण कमी झालेले आहे. आयसीएमआरच्या मते, सीरोपॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या 68 टक्के आहे, असे असताना उरलेल्या लोकांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये हिची तीव्रता जास्त राहिल. पुढच्या महिन्यात हिची सुरुवात झालेली असेल. नोव्हेंबरपर्यंत ती चालेल यानंतर वर्षाअखेर पर्यंत ती सेटल झालेली असल्याचं चित्र पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. तीव्रतेबाबत बोलायचं झालं तर अनेक लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यातून हे लोक प्रोटेक्ट होतील. यांना गंभीर होणार नाही. तसेच 10 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 30 टक्के लोकांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला आहे, हे लोकदेखील बऱ्यापैकी प्रोटेक्ट होतील. यावरुन तिसऱ्या लाटेत हा धोका कमी होईल.

प्रश्न - डेल्टा प्लसबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत काय सांगाल?

उत्तर - हा डेल्टाचाच एक प्रकार आहे. विषाणूचा स्टक्चरमध्ये बदलून हा तयार झाला आहे. त्याचे गुणधर्म बदलले आहे. डेल्टा विषाणू फार घातक होता. आता डेल्टाप्लस त्यापेक्षा जास्त घातक आहे, असे काही नाही. अजून डेल्टा प्लस तितक्या मोठ्या प्रमाणात पसरलेला नाही. जगाच्या इतर भागातही डेल्टा हाच विषाणू आहे. डेल्टा प्लसला variant of concern असं भारताने म्हटले आहे. मात्र, हा अजून dominant virus झालेला नाही.

प्रश्न - तिसऱ्या लाटेत मृत्यूदर कसा राहिल?

उत्तर - मृत्यूदर लाटेच्या तीव्रतेवरुन, यंत्रणांची तयारी किती आहे? नागरिक कोरोनाचे नियम कसे पाळतात, यावरुन ठरेल. ज्या लोकांना पूर्वी लागण झाली आहे, ज्यांनी लस घेतली आहे, जे तरुण आहे 40 वर्षाच्या आतील त्यांना ते सुरक्षित राहतील. 18 वर्षावयोगटातील मुलांना या तिसऱ्या लाटेचा फटका बसू शकतो, असं काही लोकांचं मत आहे. मात्र, ही शक्यताही खूप कमी आहे. याचं कारण असं आहे की, आतापर्यंत कोणत्याच लाटेने या वयोगटातील मुलांना affect केलेलं नाही. महाराष्ट्रातील मुंबईत आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक सर्व्हेक्षण करण्यात आला. त्यात 18 वर्षांखालील मुले संक्रमित झाली आणि आपल्याला कळलं नाही. ते आजारी पडले नाहीत. याचा अर्थ ते डेल्टा विषाणूत सुरक्षित राहिले. यावरुन ते डेल्टा प्लसमध्येही सुरक्षित राहतील. मुलांसाठी जर एक वेगळा नवीन विषाणू आला तर त्यांना त्यावरुन धोका होण्याची शक्यता आहे.

प्रश्न - लस घेऊनही काहींना लागण होत आहे. काहींचा मृत्यू होत आहे. यामुळे लसीकरणावरुन जनतेत गैरसमज होत आहे. याबद्दल काय सांगाल?

उत्तर - हा समज स्वाभाविक आहे. लोक नकारात्मक बातम्या पाहत आहेत. याचीच दुसरी बाजू पाहिली तर लस घेऊन संक्रमण झालं नाही. याबाबत आपण बातम्या पाहिल्या तर लक्षात येईल हे प्रमाण फारच जास्त आहे. मात्र, लोक नकारात्मक बातम्यांनी प्रभावित होत आहेत. यासाठी आपल्याला आकड्यांकडे पाहिले पाहिजे. लसीचा एक डोस घेतला असेल तर डेल्टामध्ये 33 टक्के प्रोटेक्शन मिळतं. दोन डोस घेतले असतील तर 65 टक्के प्रोटेक्शन मिळतं. यामुळे उरलेले जे लोक आहेत, त्यांना संरक्षण मिळतं. परंतु संक्रमण झालं तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. म्हणजे लस न घेतलेल्या 100 जणांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू होत असेल तर लस घेतलेले 100 जणांना कोरोनाची लागण झालेल्यामध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 15 इतकी आहे. म्हणजे लस घेतल्याने 85 टक्के लोक सुरक्षित राहत आहेत. ही आकडेवारी विदेशातून जेव्हा आपल्याकडे समोर येईल, तेव्हा लोकांमधील गैरसमज दूर होईल.

प्रश्न - लसीकरणाच्या कॉकटेलबाबत तुमचं मत काय?

उत्तर - युपीमध्ये जो प्रकार झाला तो चुकून झाला. मात्र, जोपर्यंत ते शास्त्रशुद्ध रित्या पूर्ण होत नाही, सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत ते करू नये. अजून व्यापक प्रमाणात जगात कुठेच असं करण्यात आलेलं नाही. फक्त कोविशिल्डच्या लसीमुळे रक्तात गाठी निर्माण होतात, असं जेव्हा समोर आलं युरोपमध्ये पहिली लस कोविशिल्डची घेतल्यावर दुसरा डोस वेगळ्या लसीचा घ्या, असा सल्ला इथल्या सरकारने दिला. याबाबत ऑक्सफर्ड आणि भारतातही अजून संशोधन सुरू आहे.

प्रश्न - तिसरा बुस्टर घेण्याची गरज आहे का? याबाबत तुमचं मत काय?

उत्तर - हेदेखील प्रायोगिक तत्त्वावर आहे. अमेरिका, इस्रायल, इंग्लंड येथील लोकांना फ्रंट लाईन वर्कला देण्यात येणार आहे. इथे पुढच्या महिन्यात देण्यात येणार आहे. नेचर नावाचं जर्नल आहे, त्यात असं दिलंय की, फायरझरची लस दिल्यावर 6 महिन्यांनी तिची efficiency 95 टक्क्यावरुन 87 टक्क्यांवर आली आहे. तर डेल्टा विषाणूत ती आणखी कमी झाली आहे. डेल्टाचा धोका कायम असल्यामुळे इथल्या सरकारने 8-9 महिन्यांनी AT RISK जे लोक आहेत त्यांना हा डोस दिला गेला पाहिजे, असा निर्णय इथे घेण्यात आला आहे. भारतात अजून याबाबत निर्णय झालेला नाही. सरकारी पातळीवर निर्णय झाल्यावर याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

प्रश्न - traditional लस आणि dna लस यात फरक काय?

उत्तर - traditional प्रकारात जुने पद्धतीने एखाद्या विषाणूला नष्ट केले जाते. निष्किय केले जाते. यानंतर त्याला लॅब केले जाते. यानंतर त्याला शरीरात inject केले जाते. म्हणजे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल. म्हणजे जेव्हा नैसर्गिक संक्रमण होईल, तेव्हा त्या शक्तीचा फायदा होतो.

dna लस - यामध्ये विषाणू पूर्ण निष्क्रिय न करता, त्या विषाणूचा असा भाग घ्यायचा शरीरात द्यायचा, त्यामुळे शरीरात विशेष (specific) रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल आणि त्याद्वारे तो विषाणू निष्क्रिय होईल. ही advanced techniques आहे. दोन्ही लसी वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. त्यामुळे त्याची सुरुवात किती होते, सुरुवातीला किती रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, ती किती काळ राहते, तिची efficiency किती आहे यामध्ये थोडाफार फरक असतो. मात्र, सध्या असलेल्या सर्व कोरोना लसींमुळे बऱ्यापैकी सुरक्षा होत आहे.

प्रश्न - भारत आणि युके सरकारच्या लसीकरणाच्या धोरणामध्ये काय फरक आहे? भारताने काही बदल करायला हवेत का?

उत्तर - भारतात सुरुवातीला कुणाचे लसीकरण केले जाईल, केव्हा दिले जाईल हे जाहीर नव्हते. मात्र, ब्रिटिश सरकारचे लसीकरणाचे धोरण जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर जाहीर झाले होते. ब्रिटिशचे सरकारचे लसीकरणाबाबतचे धोरण अगदी स्पष्ट होते. लस यायची आधी दोन्ही देशांमध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये फरक आहे. ब्रिटिश सरकारने लसीवर संशोधन करण्यासाठी पैसे दिले. लस यायच्या आधीच उत्पादनाचे पैसे दिले. अमेरिकन सरकारनेही तेच केले. लोकसंख्येचे 200-300 टक्के लस आधीच ऑर्डर केली. संशोधनाला पाठबळ दिले. प्रॅक्टिकल अॅप्रोच ठेवला. लसीचे राजकारण केले नाही आणि लसीकरण सुरू केले. जवळजवळ 75 टक्के लोकांना दोन्ही डोस तर 90 टक्के लोकांना पहिला डोस दिला गेला आहे. यामुळेच इथली तिसरी लाट आटोक्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

भारतात संशोधनाला पाठबळ न देता, राजकारण करण्यात आले. थोडक्यात सांगायचे झाले तर या लोकांनी दूरदृष्टी ठेऊन नियोजन केले. भारतात मात्र, याबाबत राजकारणच केले. भारत सरकारने आहे ती परिस्थिती स्वीकारावी. परिस्थिती न स्विकारल्यामुळेच देशातील परिस्थिती बिघडली. यामुळे हे स्विकारुन नियोजन करुन, शास्त्रशुद्ध डाटा कलेक्ट करावे, ते इंप्लिमेंट करावं. जाहिरातबाजी जास्त केली.

अमेरिकेतील काही संस्थांनी आकडेवारी दिली की 40 ते 50 लाख लोकांचा मृत्यू झाला. मात्र, आपली आकडेवारी 5 लाखांच्या आत आहे. म्हणजे जो पर्यंत आपण सत्य परिस्थिती स्विकारत नाही तोपर्यंत आपण नियोजन घेऊ शकत नाही. लसीकरणावर भर दिला पाहिजे. ती उपलब्ध करुन दिली पाहिजे. शाळा, महाविद्यालये, उद्योगधंदे, नागरिकांना सहकार्य केले पाहिजे. म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने कोरोनाचा सामना करू शकतो.

प्रश्न - कोरोनाचं संकट कधी संपेल? या भयातून नागरिक केव्हा मुक्त होतील? एक डॉक्टर म्हणून काय सांगाल.

उत्तर - हा खूप चांगला प्रश्न आहे. हा सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात हाच प्रश्न आहे. कोरोनाचं संकट संपेल आणि पुढे काहीच कोरोना राहणार नाही, असं होणार नाही. मात्र, कोरोना हा pandemic कडून endemic कडे वाटचाल करेल. दोन्हीमध्ये फरक असा आहे की, pandemic म्हणजे कोरोनाचं हे आलेलं महासंकट. तर endemic म्हणजे तो त्या-त्या भूभागात दीर्घकाळ तिथे राहतो. उदा. टीबी, डेंग्यू, मलेरिया. दरवेळेला वातावरण बदललं की त्याची लागण होते. मात्र, नंतर त्यातून आपण बरे होतो. तसाच कोरोनासुद्धा हळूहळू endemic कडे वाटचाल करेन. तोआता ब्रिटनसारख्या ठिकाणी ती वाटचाल सुरू झाली आहे. इथे मोठ्या प्रमाणात रुग्ण असूनसुद्धा रुग्णालयात रुग्ण दाखल होत नाहीत. कोरोना आता इथे गंभीर स्वरुपात नाही. भविष्यात 100 टक्के कोरोना लसीकरण झाल्यावर समाजातील नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. लोक नेहमीप्रमाणे बाहेर पडतील. नोकरीला जाऊ शकतील. परिस्थिती पूर्ववत होतील. मात्र, त्याला काही महिने किंवा 1-2 वर्ष लागतील.

Last Updated : Aug 25, 2021, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.