नवी दिल्ली: दूरदर्शनच्या बातम्यांनी एकेकाळी चांगलाच काळ गाजविला आहे. आजही अनेकजण दूरदर्शनमधील न्यूज अँकर भारतातील पहिल्या इंग्रजी न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. त्या पार्किन्सन्स आजाराने त्रस्त होत्या. बाहेरून फिरून आल्यानंतर त्या घरी कोसळल्याची माहिती कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिली.
गीताजंली अय्यर यांना पार्किन्सन्सचा आजार होता. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. कोलकात्याच्या लोरेटो कॉलेजमधून अय्यर यांनी शिक्षण घेतले. त्या 1971 मध्ये दूरदर्शनमध्ये नोकरीला सुरुवात केले. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट न्यूज अँकरचा पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रियदर्शिनी पुरस्कार देऊन गौरविले होते.
नाटकांमध्ये देखील केले होते काम: गीतांजली अय्यर या प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय होत्या. अय्यर या काही जाहिरातींसह नाटकामध्ये देखील काम केले होते. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्राममधून पदविकादेखील मिळविली होती. श्रीधर क्षीरसागर यांच्या खानदान मालिकेमध्ये त्यांनी भूमिका केली होती. जागतिक वन्यजीव निधीसाठीदेखील त्यांनी योगदान दिले. त्यांच्या निधनानंतर देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. पत्रकार शीला भट्ट यांनी ट्विट करत म्हटले, की गीतांजली अय्यर या सर्वोत्कृष्ट न्यूज अँकर होत्या. एक प्रेमळ आणि मोहक व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहोत.
-
Deeply saddened to hear about the passing of Gitanjali Aiyar, one of the first and finest English news anchors on Doordarshan and All India Radio.
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A trailblazer & pioneer, she brought credibility, professionalism, and a distinct voice to every news report, leaving an indelible… pic.twitter.com/MvaR7kgLmB
">Deeply saddened to hear about the passing of Gitanjali Aiyar, one of the first and finest English news anchors on Doordarshan and All India Radio.
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 7, 2023
A trailblazer & pioneer, she brought credibility, professionalism, and a distinct voice to every news report, leaving an indelible… pic.twitter.com/MvaR7kgLmBDeeply saddened to hear about the passing of Gitanjali Aiyar, one of the first and finest English news anchors on Doordarshan and All India Radio.
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 7, 2023
A trailblazer & pioneer, she brought credibility, professionalism, and a distinct voice to every news report, leaving an indelible… pic.twitter.com/MvaR7kgLmB
अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले दु:ख: 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनसाठी काम करणाऱ्या अय्यर यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरील पहिल्या आणि सर्वोत्कृष्ट इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक असलेल्या गीतांजली अय्यर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. या कठीण काळात तिच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. अय्यर यांनी चार वेळा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट अँकर पुरस्कार जिंकून पत्रकारितेच्या क्षेत्रात विक्रम केला. बातमीत विश्वासार्हता, व्यावसायिकता आणि एक वेगळा आवाज आणून त्यांनी पत्रकारितेत वेगळा ठसा उमटविल्याचेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले.
2019 मध्ये न्यूज अँकर नीलम शर्मा यांचे निधन: डीडी न्यूजच्या न्यूज अँकर आणि नारी शक्ती पुरस्कारप्राप्त नीलम शर्मा यांचे 2019 मध्ये निधन झाले. 'बडी चर्चा' आणि 'तेजस्विनी' या हे त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय होते. कर्करोग झाल्याने त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनानंतरही माध्यमांतून शोक व्यक्त करण्यात आला होता.