बंगळूरू - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कर्नाटकमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी अंतिमसंस्कारासाठीही स्मशानभूमीही कमी पडायला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर एका रुग्णवाहिका चालकाने नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. डॅनियल असे या रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे.
30 हजार मृतदेहांचा केला अंत्यसंस्कार -
गेल्या काही वर्षापासून डॅनियल हे सामाजिक कार्यात गुंतले आहे. कोरोनाकाळातही त्यांनी आपली कामे सुरू ठेवली आहेत. त्यांनी आतापर्यंत 30 हजारपेक्षा जास्त मृतदेहांचा अंत्यसंस्कार केला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या महाभंयकर आजारापासून आपला बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन डॅनियल यांनी केले आहे. दरम्यान, कोरोनापूर्वी कल्लापल्ली रुद्रबूम ही तीन एकरची जागा स्मशानभूमी म्हणून उपयोगात येत होती. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढण्यासोबतच येथे पावसाचे पाणी भरले आहे. त्यामुळे डॅनियल यांनी येथील परिस्थितीचे गांभीर्य सांगत नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे.