नवी दिल्ली : सर्वसामान्यांवर महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी ( DOMESTIC LPG CYLINDER PRICE INCREASED ) सिलेंडरची किंमत वाढली आहे. गॅसदरात प्रति सिलिंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता घरगुती एलपीजी सिलिंडर 1053 रुपयांना मिळणार आहे. त्याचवेळी 14.2 किलोच्या सिलिंडरबरोबरच 5 किलोच्या छोट्या घरगुती सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर 18 रुपयांनी वाढली आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात - दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर 8.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र, हा दिलासा फारसा नाही. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 198 रुपयांनी कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.
किरकोळ कपातीचा फायदा काय - काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 198 रुपयांनी कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. त्या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2021 रुपयांवर गेली होती. पण आता 8.50 रुपयांच्या आणखी कपातीसह किंमत 2012 रुपयांच्या जवळ येईल.
तुमच्या शहरातील घरगुती सिलिंडरचे दर जाणून घ्या
मुंबई : १०५३, कोलकाता: १०७९, चेन्नई: १०६९, लखनौ: 1091, जयपूर: १०५७, पाटणा: ११४३, इंदूर: 1081, अहमदाबाद: 1060, पुणे: १०५६, गोरखपूर: १०६२, भोपाळ: १०५९, आग्रा: १०६६