ETV Bharat / bharat

Saffron Milk : केशरयुक्त दूध घेतल्याने बाळ गोरे होते? जाणून घ्या बाळाच्या आरोग्यावर काय होतात परिणाम - गरोदरपणात केशरीयुक्त दुधाचे सेवन

महिलेसाठी आई होणे हे जगातील सर्वात मोठे सुख असते. प्रत्येक आईला वाटते आपले बाळ निरोगी आणि गोरे असावे ( Baby healthy and white ) मग आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे, ( Saffron Milk ) यामुळे बाळ गोरपान होते. पण खरेच केशर दूध प्यायल्याने बाळ गोर होते का? ( saffron milk during pregnancy ) यामागे खरे काय सत्य आहे. याला काही वैज्ञानिक कारण आहे का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Saffron Milk
केशरयुक्त दूध घेतल्याने बाळ गोर होतं
author img

By

Published : Sep 21, 2022, 2:22 PM IST

Updated : Sep 21, 2022, 2:51 PM IST

महिलेसाठी आई होणे हे जगातील सर्वात मोठे सुख असते. गर्भधारणेचा काळ हे प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असतो. प्रत्येक आईला वाटते आपले बाळ निरोगी आणि गोरे ( Baby healthy and white ) असावे, मग आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे,( saffron milk during pregnancy ) यामुळे बाळ गोरपान होते. तसेच अनेक उच्च शिक्षित महिलांपासून खेडेगावांमधील असुशिक्षित महिला देखील आपले मूल गोरे आणि गोंडस व्हाव यासाठी केशव युक्त दुधाचे ( Saffron Milk ) सेवन करतात. पण खरेच केशर दूध प्यायल्याने बाळ गोर होते का? यामागे खरेच काय सत्य आहे. याला काही वैज्ञानिक कारण आहे का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Saffron Milk
केशर दूध

काय होतात परिणाम? - केशरीयुक्त दुधाचे गरोदरपणात सेवन केल्याने ( Consumption of saffron milk during pregnancy ) त्याच्या आरोग्यास काही फायदे देखील होतात. तसे पाहायला गेले, तर केशर हे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी देखील आहे. गरोदरपणात केशरच सेवन केल्यामुळे महिलांचा असणारा तणाव बऱ्यापैकी कमी होत असल्याचे समोर आले आहे. गर्भवती महिलांनी जर नियमितपणे केशर युक्त दुधाचे सेवन केल्यास, महिलांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. प्रसूती होत असताना केशरमुळे महिलांचा त्रास कमी होत असल्याचे देखील समोर आले आहे.

केसरच्या अति सेवनाने महिलांचा गर्भपात होण्याची शक्यता - एकीकडे केशर खाण्याचे हे काही फायदे सांगण्यात आले असले तरी, दुसरीकडे केसरच्या अति सेवनाने महिलांचा गर्भपात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. गरोदरच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये केसरच सेवन न केलेलं योग्य असल्याचे, या विषयाचे तज्ञ सांगतात‌. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केसरच सेवन करणे आवश्यक आहे.

वैज्ञानिक कारण - केसरयुक्त दुधाचे सेवन केल्याने मूल गोरे जन्मते हा निव्वळ गैरसमज असून, याविषयी अधिकृत अशी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. बाळाचा रंग हा गोरा की काळा हे मेलॅनिनच्या पातळीवर अवलंबून असतो. असे स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ यांनी माहिती दिली आहे. शरीरातील मेलेनिनच्या उच्च पातळीमुळे बाळाची त्वचा काळी होते तर मेलेनिनचे प्रमाण संतुलित असेल तर त्वचेचा रंग हा पांढरा असतो. बाळ गोरा होण्यासाठी केशर खाणे किंवा केशर दूध पिणे फायदेशीर आहे याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

Last Updated : Sep 21, 2022, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.