नवी दिल्ली - भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या नवीन प्रकारातील ओमायक्रॉन (Doctors Discovered Two New Symptoms of Omicron ) या व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. ओमायक्रॉन विषाणूने सरकार तसेच आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी विविध निर्बंध लादले जात आहेत. एवढेच नाही तर कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला सामोरे जाण्यासाठी सातत्याने संशोधन करण्यात येत आहे. यातच ओमायक्रॉनसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन विषाणुच्या आणखी दोन लक्षणांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. डेल्टा पेक्षा कितीतरी पटीने ओमायक्रॉन हा धोकायदायक असल्याने दोनपैकी कोणतीही लक्षणे तुमच्यामध्ये अचानक दिसू लागली असतील तर काळजी घ्या. तर जीवघेण्या ओमायक्रॉनची नवी दोन लक्षणे ( Omicron Symptoms ) कोणती आहेत, हे जाणून घेऊया.
ब्रिटनमधील एका संशोधकाने ओमायक्रॉनची दोन लक्षणे ओळखली आहेत. ही दोन नवीन लक्षणे सहसा कोरोना विषाणूशी संबंधित आढळत नाहीत. कॉलेज लंडनमधील जेनेटिक एपिडेमियोलॉजीचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांच्या मते, ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर रुग्णामध्ये मळमळ आणि भूक न लागणे यासारखी दोन नवीन लक्षणे देखील दिसून येत आहेत.
ओमायक्रॉनच्या लक्षणासंदर्भात विविध दावे करण्यात आले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस आणि विशेष म्हणजे बुस्टर डोस घेतलेल्या लोकांनामध्ये ही लक्षणे दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले. म्हणजेच लसीकरणानंतर अशी लक्षणे दिसू लागली आहेत. मळमळ, सौम्य ताप, घसा खवखवणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात, असे एक्सप्रेस डॉट सीओ डॉट यूके वेबसाइटने म्हटलं. तर ओमिक्रॉनशी संबंधित काही सामान्य लक्षणांमध्ये खोकला, थकवा ही लक्षणे असल्याचे यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने म्हटलं.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात ( Coronavirus In Maharashtra ) आहेत. इतर राज्यातदेखील ओमायक्रॉनची रुग्ण दिसून येत आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
हेही वाचा - Kamboj defamation suit: मोहित कंबोज मानहानी खटला: सुनावणीला आता 12 जानेवारीला