ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री म्हणतात, लस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नसेल तर आम्ही फाशी घ्यावी का?

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी विधानसभेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गौडा म्हणाले, की राजकीय फायदा मिळविण्यासाठी आम्ही कृती कार्यक्रम तयार केला नाही. आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केला.

सदानंद गौडा
सदानंद गौडा
author img

By

Published : May 13, 2021, 8:39 PM IST

Updated : May 13, 2021, 9:56 PM IST

बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाने कोरोना लशींचे योग्य वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जर आम्हाला लशींचे पुरेसे उत्पादन मिळत नाही, तर आम्ही स्वत: फाशी घ्यायची का? अशा शब्दात केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी पत्रकार परिषदेत हतबलता व्यक्त केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने लसीकरण मोहिमेवरून आज सरकारची खरडपट्टी काढल्यानंतर गौडा यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी विधानसभेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गौडा म्हणाले, की राजकीय फायदा मिळविण्यासाठी आम्ही कृती कार्यक्रम तयार केला नाही. आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. पुरेसे उत्पादन होत नव्हते. ते आमच्या हाताबाहेर आहे.

हेही वाचा-नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

आठवडाभरात गोंधळ दूर होणार

कर्नाटकमध्ये बुधवारी ९८ हजार कोरोना लशींचे डोस होते. अजून ७५ हजार लशींचे डोस येणार आहेत. कर्नाटकला १.८ कोटीहून अधिक कोरोना लशींचे डोस मिळाले आहेत. पंतप्रधान हे स्वत: लसीकरण मोहिम पाहत आहेत. आठवडाभरात गोंधळ दूर होणार आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण थांबविण्यात आले आहे. तर ४५ वर्षांहून अधिक वयोगटाचे लसीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा-सुवर्णरोख्यात गुंतवणुकीची या पाच दिवसात मिळणार संधी; जाणून घ्या, अधिक माहिती

केंद्र सरकार कोरोना व्यवस्थपानात अपयशी नसल्याचा दावा-

केंद्र सरकार कोरोना व्यवस्थपानात अपयशी ठरले नसल्याचा दावाही यावेळी गौडा यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांबरोबर चांगला संवाद साधून औषधे, ऑक्सिजन आणि आर्थिक मदत केली आहे. पंतप्रधान यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय संबंध चांगले आहेत. जगभरातील देशांकडून मदत येत आहे. पंतप्रधान केअर निधीमधून राज्याला ३०३.६३ कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष पॅकेजच्या संदर्भात बोललो नसल्याचेही केंद्रीय रसायने मंत्री सदानंद गौडा यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, देशभरातील बहुतांश सर्वच राज्यांमध्ये लशींचा तुटवडा आहे. दुसरीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत असताना लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे.

Last Updated : May 13, 2021, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.