ETV Bharat / bharat

Goa Election Result 2022 : पक्ष बदल करणाऱ्या 'त्या' आमदारांना अपात्र ठरवा : काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव - पक्ष बदल करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवा

गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ( Goa Election Result 2022 ) सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ( Congress In Supreme Court ) आहे. २०१७ साली पक्ष बदलून भाजपात गेलेल्या काँग्रेसच्या १० आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली ( Disqualify MLAs who change parties ) आहे.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Mar 10, 2022, 10:27 AM IST

नवी दिल्ली: गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ( Goa Election Result 2022 ) आज सुरु आहे. यंदाही गेल्या वेळेप्रमाणे आमदारांची फोडाफोडी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०१७ साली पक्ष बदलून भाजपात गेलेल्या तत्कालीन १० आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी ( Disqualify MLAs who change parties ) करत काँग्रेसच्या गोवा युनिटने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ( Congress In Supreme Court ) आहे.

2017 मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक १७ आमदार निवडून आले होते. तर भाजपचे १३ आमदार होते. त्यानंतर भाजपने आमदारांची फोडाफोडी करत काँग्रेसच्या १० आमदारांना भाजपात दाखल करून घेतले होते.

अचानकपणे पक्षांतर करणाऱ्या या आमदारांना अपात्र ठरवण्याची काँग्रेसची विनंती विधानसभा सभापतींनी फेटाळली होती. कारण दोन तृतीयांश आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. आता काँग्रेसने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काँग्रेसच्या या निर्णयाचा आज येणाऱ्या निकालांवर काहीही परिणाम होणार नसून, आज विजयी झालेल्या आमदारांचे पक्षांतर रोखण्याची रणनीती म्हणून याकडे पाहिले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.