ETV Bharat / bharat

Swami Prakhar Maharaj Case: संत प्रखर महाराज लैंगिक शोषण प्रकरण: बचाव करत पीडित शिष्येचे कुटुंबावरच आरोप

स्वामी प्रखर महाराजांवर ( Swami Prakhar Maharaj controversy ) त्यांच्या शिष्याच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने ओलीस ठेवल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप प्रखर महाराज यांच्या शिष्येने फेटाळून लावला. स्वत:च्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याचे कारण देत शिष्येने प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, संन्यास घेण्यापूर्वीच कुटुंबीयांकडून त्यांच्यावर सतत दबाव टाकला ( Swami Prakhar Maharaj in abuse case ) जात होता.

पीडित शिष्या
पीडित शिष्या
author img

By

Published : Apr 6, 2022, 8:44 PM IST

Updated : Apr 6, 2022, 9:15 PM IST

लखनौ- कानपूरमध्ये एका मुलीसोबत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हरिद्वारचे तथाकथित संत प्रखर महाराज ( Case against Swami Prakhar Maharaj in Kanpur ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता प्रखर महाराजांच्या शिष्या संत प्रखर महाराज यांच्या बचावासाठी पुढे आल्या आहेत. या शिष्येने गुरूचा बचाव करताना आपल्याच पालकांवर कट रचल्याचा आरोप केला आहे. चिदानंदमयी यांच्या पालकांनीही प्रखर महाराज यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

स्वामी प्रखर महाराजांवर ( Swami Prakhar Maharaj controversy ) त्यांच्या शिष्याच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने ओलीस ठेवल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप प्रखर महाराज यांच्या शिष्येने फेटाळून लावला. स्वत:च्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याचे कारण देत शिष्येने प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, संन्यास घेण्यापूर्वीच कुटुंबीयांकडून त्यांच्यावर सतत दबाव टाकला ( Swami Prakhar Maharaj in abuse case ) जात होता. संन्यांस सोडून पुन्हा प्रांपचिक जीवनात येण्यासाठी कुटुंबाने आग्रह केला. पण, ती संन्याशाच्या निर्धारावर ठाम राहिली आहे.

बचाव करत पीडित शिष्येचे कुटुंबावरच आरोप

कुटुंबीयांवरही मारहाण केल्याचा आरोप- शिष्येने आपल्या कुटुंबीयांवरही मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना व इतर ठिकाणी दिलेली तक्रार पत्रेही त्यांनी दाखविली आहेत. आपलेच कुटुंब गुरु स्वामी प्रखर महाराज यांच्या आश्रमाची मालमत्ता हडप करण्याचा कट रचत असल्याचा आरोपही केला आहे. शिष्येने आपल्या जीवाला धोका असल्याचे कुटुंबीयांना सांगितले आहे. तिच्या सुरक्षेसाठी आणि कुटुंबावर कारवाईची मागणी करत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय होते प्रकरण : यूपी राज्य महिला सदस्या पूनम कपूर यांच्या सांगण्यावरून कानपूरमधील किदवई नगर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. प्रखर महाराज असे या संताचे नाव असून त्यांचा हरिद्वार, उत्तराखंड येथे आश्रम आहे. पूनम कपूर यांनी सांगितले की, ती सखी वन स्टॉप सेंटरमध्ये एका महिलेची तक्रार ऐकत होती. तेव्हा पीडितेची आई आली आणि तिच्यासमोर रडू लागली. ती महिला आणि तिचा पती हे प्रखर महाराजांचे भक्त आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना ते अनेकदा हरिद्वारला जात असत. महिलेच्या म्हणण्यानुसार, एक-दोनदा ती आपल्या मुलीलाही प्रखर महाराजांच्या कार्यक्रमाला घेऊन गेली होती. तेव्हा प्रखर महाराजांची नजर त्यांच्या मुलीवर पडली.

मुलीबरोबर गैरवर्तन केल्याचा आईचा आरोप- प्रखर महाराजांनी मुलीच्या आईला सांगितले की ते शाळा आणि आश्रम बांधत आहेत. त्यामुळे तिने कधीतरी मुलीला कामासाठी त्याच्याकडे पाठवावे. मात्र, त्यापूर्वीच प्रखर महाराज यांनी त्यांच्या मुलीला दीक्षा देण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावले. तेथे प्रखर महाराज मुलीला एकट्या खोलीत घेऊन गेले. तेथे तिच्यासोबत गैरवर्तन केले. पूनम कपूर यांनी सांगितले की, यानंतर मुलगी खोलीतून बाहेर आली. पालकांना म्हणाली की तुम्ही येथून निघून जा, कारण येथे तुमच्या जीवाला धोका आहे. माझ्यासोबत जे काही चुकीचे होते ते घडून गेले.

मुलीचे केस कापले, महाराजांचे कपडे घातले : पीडितेच्या आईने राज्य महिला आयोगाच्या सदस्या पूनम कपूर यांना सांगितले की, प्रखर महाराज यांनी मुलीचा पूर्णपणे ब्रेनवॉश केला आहे. मुलीचे केस कापले आणि महाराजांनी घातलेले कपडे घालण्यास भाग पाडले. मुलीसोबत घडलेल्या घटनेनंतर आईची खूप वाईट स्थिती झाली होती. आपली मुलगी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

हेही वाचा-Keshav Upadhyay Press conference : जिल्हा परिषदेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला तरी पालकमंत्री गप्प का? - केशव उपाध्याय

हेही वाचा-Digambar Kamat : कॉंग्रेस नेते दिगंबर कामत भाजपच्या वाटेवर? चर्चांना उधाण

हेही वाचा-First Case XE Variant : भारतामध्ये 'एक्सई'चा या व्हेरियंटचा पहिला रुग्ण मुंबईत

Last Updated : Apr 6, 2022, 9:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.