ETV Bharat / bharat

Seema Haider : सीमा हैदरला चक्क चित्रपटात भूमिकेची ऑफर, जाणून घ्या कोण देतय संधी - अमित जानी

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. एका भारतीय दिग्दर्शकाने तिला चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली आहे. (Seema Haider role in film).

Seema Haider
सीमा हैदर
author img

By

Published : Jul 31, 2023, 10:44 PM IST

अमित जानी

मेरठ : प्रेमाखातर पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू, दोघीही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एकीकडे, अंजूला तिथल्या सरकारने जमिनीसह सरकारी नोकरीचे आश्वासन दिले. तर आता भारतातील एका चित्रपट दिग्दर्शकाने सीमा हैदरला चक्क चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली आहे. सीमा हैदरने माझ्या चित्रपटात काम करावे. यामुळे तिला आर्थिक पाठबळ मिळेल, असे हे दिग्दर्शक म्हणाले.

..म्हणून दिली चित्रपटात काम करण्याची ऑफर : उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि मुंबईत एक फिल्म प्रोडक्शन हाऊस चालवणारे मेरठचे रहिवासी अमित जानी यांनी सीमा हैदरला चित्रपटात भूमिकेची ऑफर केली आहे. 'सीमा हैदर आणि सचिन आर्थिक संकटात असल्याची माहिती मिळाली. अशा परिस्थितीत मला सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची संधी द्यायची आहे', असे ते म्हणाले. मात्र सीमाने ज्या पद्धतीने भारतात प्रवेश केला, त्याचे समर्थन करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीमाने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती : ते म्हणाले की, सीमा आणि सचिनच्या घरात खायला अन्न नसल्याचे कळाले. आपल्या देशात कोणी उपाशी मरत असेल तर त्यांना काम देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. अमित जानी यांचे मुंबईत 'जानी फायरफॉक्स' नावाचे फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे. सध्या ते उदयपूरमधील कन्हैया लाल साहूच्या हत्येवर, 'ए टेलर मर्डर स्टोरी' नावाचा चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होईल. सीमा हैदरला त्यांच्या फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायचे असेल तर तिने येऊन काम करावे आणि पगार घ्यावा, असे अमित जानी म्हणाले. ते म्हणाले की, मी अनेक मुलाखतींमध्ये पाहिले आहे की, सीमाने तिला गदर-2 चित्रपटात काम करायचे असल्याचे सांगितले होते.

अमित जानी लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध : दिग्दर्शक अमित जानी लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी जखमी प्रदीप मेहरा यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. तसेच कोरोनाच्या काळात त्यांनी मेरठला दहा रुग्णवाहिकाही दान केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. Seema Haider : 'अदनान सामीला नागरिकत्व दिले, सीमा हैदरला का नाही?', सीमाच्या वकिलांचा सवाल
  2. Seema Haider News : सीमा हैदरचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात? एटीसएने विचारले 'हे' 13 प्रश्न, उत्तरांनी वाढला संशय
  3. Seema Haider News: सीमाला पाकमध्ये परत पाठवा, अन्यथा पुन्हा मुंबईवर हल्ला...मुंबई पोलिसांना धमकी, नेमके प्रकरण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.