सॅन फ्रान्सिस्को: दिग्गज Google व्हिडिओ सेवा 'गुगल मीट' मध्ये एक नवीन वैशिष्ट्य आणत आहे ज्यात वापरकर्त्यांना मीट वर बोलत असताना कंटेंट पाठवता येऊ शकणार आहे. Google ने वर्कस्पेस अपडेट्स ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रेझेंटेशन तयार करताना, वापरकर्ते फ्लोटिंग अॅक्शन मेनूमधून किंवा Meet चॅटमधील सूचनांद्वारे फायली शेअर करू शकतात. नवीन वैशिष्ट्यात Meet वरून थेट शेअर करण्याची सोय आहे. यासाठी तुम्हाला दुसर्या इतर विंडोवर जाण्याची आवश्यकता नाही.
यात मीटिंगमधील सहभागींना तुम्ही पाठवलेला कंटेंट लगेच आणि नंतरही शोधणे सोपे होते, असे Google ने सांगितले आहे. याशिवाय, Google कंपनीने असेही घोषित केले की, जेव्हाही वापरकर्ते मीटिंग चॅटमध्ये लिंक पेस्ट करतील तेव्हा त्यांना फाइल ऍक्सेस संदर्भात सूचित केले जाईल. तेथून, वापरकर्ते आवश्यकतेनुसार कंटेंट पाहु शकतात तसेच संबंधित फायली कॅलेंडर इव्हेंटमध्ये संलग्न करू शकतात. या महिन्याच्या सुरुवातीला, टेक जायंटने घोषणा केली की ते एक नवीन वैशिष्ट्य जोडत आहे जे वापरकर्त्यांना Google Slides सादर करताना Google Meet मध्ये त्यांच्या स्पीकर नोट्स पाहण्याची परवानगी देईल. यासाठी, तुम्हाला स्लाइड कंट्रोल बारमधील नवीन स्पीकर नोट्स बटणावर क्लिक करावे लागेल.
Google ने व्हिडिओ काॅलिंग सेवेसाठी एक नवीन वैशिष्ट्य घोषित केले होते. यात Google Meet वर इमोजी प्रतिक्रिया लॉन्च करत आहे, Google Meet इमोजी प्रतिक्रिया वापरकर्त्यांना एकमेकांशी कनेक्ट होण्यास मदत करतील. टेक जायंटने बुधवारी वर्कस्पेस अपडेट्स ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, वापरकर्ते आता वेबवरील Google Meet, Meet हार्डवेअर डिव्हाइसेस आणि Android सह iOS मध्ये मीटिंगमधील प्रतिसाद शेअर करण्यासाठी इमोजी वापरू शकतात. हे प्रतिसाद प्रेषकाच्या व्हिडिओ टाइलवर स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक लहान बॅज म्हणून दिसतील.
फीडबॅक शेअर करण्यासाठी वापरकर्त्यांना फीडबॅक बार मिळविण्यासाठी कंट्रोल बारमधील स्माइली आयकॉन निवडावा लागेल. वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीचा स्कीन टोन निवडण्यासाठी या बारवर सोय आहे, जे रंग बदलाच्या अधी असलेल्या सर्व इमोजींना लागू होईल. मीटिंगमधील फीडबॅक स्पीकरमध्ये व्यत्यय न आणता मीटिंगमध्ये व्यस्त राहण्याचा आणि सहभागी होण्याचा एक हलका, मार्गही देतो असे कंपनीने म्हटले आहे. आम्हाला आशा आहे की या वैशिष्ट्ये तुमच्या सहकार्यांना आणि स्टेकहोल्डरसाठी अधिक चांगल्या प्रकारे जोडलेले आणि गुंतलेले राहण्यासाठी सोपे करतील, मग ते घरी असले, ऑफिसमध्ये असले किंवा ते कुठेही काम करत असले तरीही.
हेही वाचा : Microsoft New Version : मायक्रोसॉफ्टचे नवीन वर्जन - विंडोज 11