ETV Bharat / bharat

Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू - बस अपघात लेटेस्ट न्यूज

इंदूरहून जळगावमधील अंमळनेरला निघालेली बस ( MH 40 N 9848 ) नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू ( Bus Fell In Narmada River ) झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही भीषण दुर्घटनाघडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. अपघाताचे वृत्त कळताच प्रशासनाने बचाव कार्य वेगाने सुरू केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Bus Fell In Narmada River
Bus Fell In Narmada River
author img

By

Published : Jul 18, 2022, 11:37 AM IST

Updated : Jul 18, 2022, 4:39 PM IST

भोपाळ - इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. नदीच्या पुलावरील कठडा तोडून ही बस नदीपात्रात कोसळली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. इंदोरहून ही बस सकाळी साडेसात वाजता निगाली होती. खलघाट अणि ठीगरीमध्ये नर्मदा पुलावर येताच या बसचा अपघात झाला. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश श्रावण चौधरी (वाहक) हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

अंमळनेरला जाणारी बस नर्मदा नदीत कोसळली

इंदूरहून अंमळनेरला निघाली होती बस - इंदूरहून अंमळनेरकडे जाणारी महाराष्ट्र रोडवेजची बस धार जिल्ह्यातील खलघाट संजय सेतूवरून कोसळल्याने 13 जण ठार झाले आहेत. या अपघातातील १५ जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले आहे, असे मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

तांत्रिक अपघातामुळे अपघात - या पुलावरून जात असतानाच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाचे बसवरील सुटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण अद्याप बेपत्ता आहेत. या अपघातग्रस्त बसला नदी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अपघातस्थळी एसटीचे अधिकारी रवाना झाले आहेत.

प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी यांच्या शोकसंवेदना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताची माहिती घेतली असून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, इंदूरहून अंमळनेरला जाणाऱ्या बसच्या अपघाताचे वृत्त धक्कादायक आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातस्थळी वेगाने कार्य सुरू असून आवश्यक ती मदत प्रशासन करीत आहे.

Bus Fell In Narmada River
चंद्रकांत एकनाथ, चालक

मुख्यमंत्री शिंदेंची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेनंतर तातडीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत सांगितले की, इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री यासंदर्भात मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.

Bus Fell In Narmada River
प्रकाश चौधरी, वाहक

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही घेतली माहिती - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताची माहिती घेतली आहे. इंदोर-अमळनेर ही एसटी महामंडळाची बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि एसीट प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आठ मृतांची ओळख पटली - अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 9 पुरुष आणि 4 महिला आहेत. 8 जणांची ओळख पटली आहे. मध्य प्रदेश परिवहन विभागाचे अधिकारी या अपघाताची चौकशी करत आहेत. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच समजेल असे शेखर चने (उपाध्यक्ष, एस टी महामंडळ) यांनी सांगितले. एसटी अपघातात 1) चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश चौधरी (वाहक), निंबाजी आनंद पाटील, कमलाबाई आनंद पाटील, चेतन गोपाल जांगिड, जगन्नाथ हेमराज, सैफुद्दीन अब्बास, अरवा मूर्तजा यांचा मृत्यू झाला आहे. यातील काही अमळनेर, इंदूर आणि राजस्थानचे रहिवासी आहेत.

  • धार, मध्य प्रदेश में हुए बस हादसे में अनेक यात्रियों के हताहत होने से गहरा दुःख हुआ है। इस दुर्घटना में अपने प्रियजनों को खोने वाले शोक संतप्त परिवारों के प्रति मेरी हार्दिक संवेदनाएं। मैं घायल हुए लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ।

    — President of India (@rashtrapatibhvn) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रपतींनी केल्या संवेदना व्यक्त - राष्ट्रपतीनी मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या बस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. असे ट्वीट केले आहे.

हेही वाचा - Nagpur Thermal Power Plant : नागपूर कोराडी औष्णिक वीज केंद्र राख तलावाचा बांध फुटला; नागपूरकरांवर जलसंकट, शेतीवरसुद्धा होणार परिणाम

Last Updated : Jul 18, 2022, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.