फतेहपूर (उत्तरप्रदेश): नवरात्रीच्या सप्तमीनिमित्त जिल्ह्यातील कल्याणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गुगौली गावाजवळील शिव भवानी माता मंदिरात एका भक्ताने जीभ कापून अर्पण केली. जीभ अर्पण करताच भक्त रक्ताने माखला. हे पाहून मंदिरात एकच खळबळ उडाली. ही वार्ता आजूबाजूच्या परिसरात पसरताच मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचू लागले. पोलिसांनी माहिती मिळताच भाविकाला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःची जीभ कापून घेणाऱ्यावर उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु : फतेहपूरमध्ये नवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक देवी मंदिरात दर्शनासाठी पोहोचत आहेत. यादरम्यान श्रद्धेची विविध रूपे पाहायला मिळत आहेत. कल्याणपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज यादव यांनी सांगितले की, गुगौली गावातील कल्याणपूर पोलीस स्टेशन कल्याणपूर जिल्हा फतेहपूर येथील रहिवासी बाबुराम पासवान (६५ वर्षे) या भक्ताने अर्धी जीभ कापून गुगौली गावाजवळील शिव भवानी माता मंदिरात अर्पण केल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी पोहोचून वृद्धाला रुग्णालयात दाखल केले. जीभ कापून घेतलेल्या वृद्धावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
दीर्घकाळ होते शिवभवानीचे पुजारी : त्याचवेळी गावकऱ्यांमध्ये ही चर्चा वेगाने पसरली. काही वेळातच भाविकांची मोठी गर्दी झाली. बाबुराम पासवान हे दीर्घकाळ शिवभवानीचे पुजारी होते असे म्हणतात. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविकांकडून जीभ कापून माँ भवानीच्या दरबारात अर्पण केल्याचा अंदाज लोकांकडून वर्तविला जात आहे. यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. अनेकदा भाविक हे विविध कारणांसाठी देवाकडे नवस बोलत असतात. बोललेला नवस हा काम झाल्यानंतर पूर्ण केला जातो, त्यासाठी भाविक कुठल्याही थराला जात असतात.
भाविकांकडून नवस फेडताना होणारे अनेक प्रकार आपण पहिले असतील. मात्र हा जीभ कापून देवीला अर्पण करण्याचा प्रकार त्या भक्ताच्याच जीवावर बेतल्याचे पाहावयास मिळत आहे. असे जीवघेणे प्रकार करून स्वतःच्याच जीवाला संकटात टाकण्यात येत असल्याने असे प्रकार चर्चेचा विषय होत आहेत.
हेही वाचा: मंदिराजवळ घरावर रात्री येऊन फेकले बॉम्ब, दोन फुटले, पाच जिवंत बॉम्ब ताब्यात