ETV Bharat / bharat

Devendra Fadnavis on cabinet : न्यायालयाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा संबंध नाही- देवेंद्र फडणवीस - cabinet expansion

लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार ( cabinet expansion ) आहे. जनतेच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहे. आमच्यासोबत आलेला शिवसेनेचा एकही आमदार पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अपात्र आमदारांविषयी सुनावणी व मंत्रिमंडळ विस्तार याचा काही संबंध नसल्याचे सांगत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करू, तुमच्या मनामध्ये जे आहे त्याच्या अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले.

Devendra Fadnavis on cabinet expansion
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 7, 2022, 12:22 PM IST

Updated : Aug 7, 2022, 2:20 PM IST

नवी दिल्ली - लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. जनतेच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहे. आमच्यासोबत आलेला शिवसेनेचा एकही आमदार पडणार नाही. न्यायालयाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी ( dyCM on cabinet expansion ) बोलताना सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर ( Eknath Shinde Delhi Visit ) आहेत. दोघेही नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्यास उशीर होत असल्याने विरोधकांकडून सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यावर दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, ही तारीख त्यांनी जाहीर केली नाही.

राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच सरकार येऊन ३८ दिवसांचा कालावधी लोटला तरी सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आहे. याबाबत सातत्याने प्रश्न निर्माण केले जात आहेत? विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या प्रश्नावर सरकारला वारंवार धारेवर धरल आहे. याच प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं सांगत अजित दादांना अशाप्रकारे बोलावेच लागेल कारण राजकारणात असं बोलावं लागतं असा टोलाही लगावला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः ओबीसी समाजाचे असल्याकारणाने त्यांनी ओबीसी समाजासाठी भरपूर केले आहे व करणार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? हे प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारले जात असताना शिंदे गटाचे आमदारच नाहीत तर भाजपच्या नेत्यांनाही मंत्रिमंडळ विस्ताराची घाई लागली आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारांसाठी सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच लागलेले आहे. त्यातच जेव्हा, जेव्हा शिंदे- फडवणीस दिल्ली दरबारी जातात तेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता सर्वांना मोठ्या प्रमाणात होते. अशातच आता दिल्ली दरबारी असलेल्या देवेंद्र फडवणीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे असे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अपात्र आमदारांविषयी सुनावणी व मंत्रिमंडळ विस्तार याचा काही संबंध नसल्याचे सांगत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करू, तुमच्या मनामध्ये जे आहे त्याच्या अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले.

माहिती नसताना केवळ राजकीय डायलॉगबाजी!राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले गेले आहेत या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की माहिती नसताना सुद्धा अशा पद्धतीची राजकीय डायलॉगबाजी केली जात आहे. या अगोदर सुद्धा काही ठराविक न्यायिक प्रकरणांमध्ये सचिवांना मंत्र्यांचे अधिकार दिले गेले आहेत. हे सरकार जनतेच आहे. जनतेचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते याबाबत निर्णय घेतील. परंतु सर्व अधिकार सचिवांना दिलेले गेले नाही आहेत. काही ठराविक निर्णय निर्णयाबाबत सचिवांना अधिकार दिले गेले आहेत, अजित पवार याविषयी बोलतात कारण त्यांना राजकीय बोलावच लागतं,असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर कोण काय म्हणतात याला महत्त्व नाही तर परिस्थितीला महत्त्व आहे असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय मंत्र्यांचे दौरे!येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ६ महिन्यात १६ मतदारसंघात विशेष लक्ष भाजपने दिले आहे. जे शिवसेनेचे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांनाही निवडून आणण्याचे काम हे आमच्यावर असणार आहे. आम्हाला फक्त आमची ताकद वाढवायची नाही तर शिवसेनेच्या खासदारांना ही निवडून आणण्यासाठी आम्हाला कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. याच अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. कल्याण आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये अनुराग ठाकूर, दक्षिण मध्य मध्ये नारायण राणे, पालघर मध्ये प्रल्हादसिंग पटेल, विश्वेश्वर तुडू, रायगड,शिर्डीमध्ये प्रल्हाद पटेल तर बारामतीला निर्मला सीतारामन, औरंगाबाद आणि बुलढाण्याला भूपेंद्र यादव, चंद्रपूरला हरदिपसिंग पुरी हे दौरा करणार आहेत, असेही फडवणीस म्हणाले.

पंतप्रधान व मला ओबीसी समाजाची पूर्ण जाण?नोटिफिकेशन न निघालेल्या ९२ नगरपालिकांना अध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे परंतु सदस्य पदासाठी नाही याबाबत आमची न्यायिक प्रक्रिया सुरू असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजासाठी महत्त्वाचे २२ निर्णय घेतले. ओबीसीला राजकीय आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन मी पूर्ण केलं. त्याचबरोबर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार ओबीसी हिताचं सरकार असल्याचही त्यांनी सांगितल आहे. मला राजकारणात ३० वर्षे झाली व ज्या नागपूर क्षेत्रामधून मी निवडून येतो तिथे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असून ओबीसी समाजाचे लोक मला निवडून देत आहेत, म्हणून मला ओबीसी प्रश्नाची जाण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत. त्याचबरोबर केंद्रात ४०% ओबीसी मंत्री देण्याचा विक्रम पंतप्रधान मोदींनी केल्याचंही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं. दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची परिषद आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्रीमंडळ स्थापन होण्यास विलंब: महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 आहे. त्यातील 15 टक्के म्हणजे 42 जणांना मंत्रीमंडळात स्थान दिले जाते. मुख्यमंत्र्यांचाही यात सहभाग असतो. राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. 40 आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवे सरकार स्थापन झाले. १ जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बैठकांचा धडाका लावला आहे. आज मंत्रालयात तिसरी बैठक पार पडली. मात्र चौदा दिवस उलटून गेले तरी, अद्याप मंत्रीमंडळ स्थापन झालेले नाही. सत्ता स्थापनेनंतर मंत्रीमंडळ विलंब होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1995 आणि 2004 साली अशीच घटना महाराष्ट्रात घडली होती.

मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा? - त्यानंतर पुन्हा २२ जुलै रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समारोपार्थ आयोजित भोजन कार्यक्रमात सामील होण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर २४ जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. व आता २७ जुलै रोजी ते दिल्लीत गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात किती सदस्य असावेत, मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा? यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः या गोष्टीला नकार दिला असल्याकारणाने या चर्चा जरी बंद झाल्या असल्या तरीही जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या चर्चा पुन्हा रंगणार आहेत.

हेही वाचा-Aditya Thackeray criticized rebel MLA : ३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली, आदित्य ठाकरे बंडखोरांवर बरसले

Last Updated : Aug 7, 2022, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.