ETV Bharat / bharat

Devendra Fadnavis : काँग्रेस फक्त खोटं बोलते, दिलेली एक तरी गॅरंटी पूर्ण केली का? फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis : सोमवारी इंदूरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. कॉंग्रेस फक्त निवडणुकीत आश्वासनं देते आणि मतांचं राजकारण करते, असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 2:24 PM IST

इंदूर (मध्य प्रदेश) Devendra Fadnavis : तेलंगणात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधींनी दिलेल्या सहा गॅरंटी योजनेला भाजपनं खोटं ठरवलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जन आशीर्वाद यात्रेत सहभागी होण्यासाठी इंदूरला पोहोचले होते. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदीनीं ९ वर्षात लोकांचं जीवन बदललंय, जे दिसून येतं.

काँग्रेस फक्त खोटं बोलते : सोमवारी इंदूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फक्त तेलंगणातच नाही तर जिथे-जिथे काँग्रेसनं गॅरंटी दिली, तिथे काँग्रेस एक तरी गॅरंटी पूर्ण करू शकली का? काँग्रेस फक्त खोटं बोलते. निवडणुकीत आश्वासनं देते आणि मतांचं राजकारण करते. पण नंतर काँग्रेसवाले या गोष्टी विसरतात. कारण ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असं फडणवीस म्हणाले.

'इंडिया' आघाडीत सगळेच नेते : उद्धव ठाकरे 'इंडिया' आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेच्या प्रश्नावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. इंडिया आघाडीत कोणीही एकमेकांना नेते म्हणून स्वीकारायला तयार नाही. आघाडीत जितके पक्ष आहेत, त्यापेक्षा दुप्पट नेत्यांची संख्या आहे. त्यामुळे अशा प्रकारची युती कधीच चालत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, यातील बहुतांश नेत्यांचं दुसऱ्या राज्यात अस्तित्व नाही. ममता दीदी उत्तर प्रदेशात आणि अखिलेश बंगालमध्ये कोणताही चमत्कार करू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

राहुल गांधींच विधान गांभीर्यानं घेण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. राहुल गांधींनी मोदी सरकारवर तेलंगणातील ओवेसी आणि इतर नेत्यांवर गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोप केला होता. यावर, राहुल गांधी सकाळी काय बोलतात ते त्यांना संध्याकाळी आठवत नाही. संध्याकाळी ते काय बोलतात ते दुसऱ्या दिवशी आठवत नाही. त्यामुळे ते काँग्रेसचे मोठे नेते असले तरी त्यांची विधानं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले.

सनातन कधीच संपणार नाही : देवेंद्र फडणवीस यांनी सनातन धर्माबाबतही भाष्य केलं. सनातन संस्कृती आणि धर्माच्या विरोधात कोणीही बोलू नये. तुम्ही हिंदू धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मावर बोलून दाखवा. इस्लामवर बोलण्याचा प्रयत्न करा. अशाप्रकारे सनातनच्या विरोधात बोलणे आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणे यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही. जे सनातनच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. सनातन कधीच संपणार नाही. पण जे सनातनच्या विरोधात विचार करतात, त्यांचे विचार नक्कीच संपतील, असा इशारा फडणवीसांनी दिला.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session : रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा गरीब मुलगा संसदेत पोहोचला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.