ETV Bharat / bharat

'चीन आक्रमक असेल तर आम्हीसुद्धा तितकेच तयार' - भारत आणि फ्रान्स युद्ध अभ्यास

भारत आणि फ्रान्स यांच्यात सुरू असलेल्या ‘डेझर्ट नाईट -21’ च्या औपचारिक समारोपासाठी भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदौरिया जोधपूरला पोहचले. यावेळी त्यांनी चीनला इशारा दिला. येत्या काळात चीन आक्रमक असेल तर आम्हीसुद्धा तितकेच तयार आहोत,असे ते म्हणाले.

भदौरिया
भदौरिया
author img

By

Published : Jan 23, 2021, 8:42 PM IST

जोधपुर - येत्या काळात चीन आक्रमक असेल तर आम्हीसुद्धा तितकेच तयार आहोत, असे हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस भदौरिया म्हणाले आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात सुरू असलेल्या ‘डेझर्ट नाईट -21’ च्या औपचारिक समारोपासाठी भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदौरिया जोधपूरला पोहचले. यावेळी ते बोलत होते.

भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदौरिया

भारत आणि फ्रान्स दरम्यानच्या युद्ध अभ्यासात दोन्ही बाजूंच्या लढाऊ विमानांनी भाग घेतला. हा युद्धअभ्यास लहान होता. मात्र, बरेच काही शिकण्यासारखे होते, असे भदौरीया म्हणाले. संयुक्त युद्धअभ्यास हा कुणाच्या विरोधात नसतो. सध्या आपल्याकडे 8 राफेल आहेत. या महिन्याच्या अखेरीस आणखी 3 राफेल भारतात येतील. भारतीय पायलटचे फ्रान्समध्ये प्रशिक्षण सुरू आहे. भारतातही आम्ही वेगवेगळ्या बॅच बनवून प्रशिक्षण देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

चीन लढाऊ विमानांच्या सहाव्या पिढीवर काम करीत आहे. आपण अद्याप 5 व्या पिढीपर्यंत पोहोचलो नाही, असा प्रश्न भदौरीया यांना विचारण्यात आला. तेव्हा उत्तरात भदोरिया म्हणाले की, आम्ही मिग -21 श्रेणीसुधारीत करण्यात येत आहे. तसेच पाचव्या पिढीसाठी डीआरडीओकडून काम सुरू आहे. पाचवी पिढी विकसित होत आहे आणि पाचव्या पिढीमध्येच अनेक नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्स नेहमीच भारताच्या पाठीशी -

फ्रान्स नेहमीच भारताच्या पाठीशी आहे. 1998 साली पोखरनमध्ये झालेल्या अणुस्फोटांच्या विरोधात संपूर्ण जग होते. परंतु आम्ही एकत्र होतो आणि आजही आम्ही एकत्र आहोत, असे फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.