ETV Bharat / bharat

डेल्टा प्लसने वाढविली चिंता; तातडीने उपाययोजना करण्याचे केंद्राचे आठ राज्यांना पत्र - डेल्टा प्लस व्हेरियंट

४५,००० नमुन्यांमध्ये ५१ नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक डेल्टा प्लसचे २२ रुग्ण आढळले आहेत.

Delta Plus variant
डेल्टा प्लस
author img

By

Published : Jun 26, 2021, 6:06 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियन्टने सरकारची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्टमेंट क्षेत्र घोषित करणे, गर्दी टाळणे, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणे व डेल्टा प्लस आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असले तरी आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला पत्र पाठविले नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गुजरात आणि हरियाणा या राज्यांना पत्र पाठवून डेल्टा प्लस नियंत्रणात आण्यासाठी सूचना केल्या आहेत. कोरोनाबाधितांचे नमुने हे इंडियन सार्स कोव्ह-२ जिनोमॅक कॉन्सॉर्टिया (इन्साकॉग) प्रयोगशाळेत पाठवावेत, अशी त्यांनी पत्रात राज्यांना विनंती केली आहे. या नमुन्यांमुळे महामारीमधील वैद्यकीय संबंध समजू शकेल असे आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटले आहे.

हेही वाचा-जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विशेष: सहा महिन्यात आर्थिक राजधानीत 43 कोटींची कारवाई

डेल्टा प्लसने वाढविली चिंता-

डेल्टा प्लसचे रुग्ण हे तिरुपती (आंध्र प्रदेश), सुरत (गुजरात), फरिदाबाद (हरियाणा), कात्रा (जम्मू आणि काश्मीर, बिकानेर (राजस्थान), पतियाला आणि लुधियाना (राजस्थान), म्हैसुरू (कर्नाटक) आणि तामिळनाडूमधील चेन्नई, मदुराई व कांचीपुरम येथे आढळले आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंट हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न (variant of concern) आहे. कारण, त्यामध्ये संसर्गाची अधिक क्षमता, फुफ्फुसांच्या पेशींना अधिक चिकटणे आणि शरीरातील प्रतिकारक्षमता कमी करण्याची क्षमता आहे. या जिल्ह्यांमध्ये कंटेन्टमेंट क्षेत्राच्या उपाययोजना कराव्यात व गर्दी टाळावी, अशा विविध उपाययोजना राजेश भूषण यांनी सूचविल्या आहेत.

हेही वाचा-सूत्रे आमच्या हाती द्या, तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो.. नाहीतर राजकीय संन्यास घेईल - फडणवीस

४५,००० नमुन्यांमध्ये ५१ नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट

४५,००० नमुन्यांमध्ये ५१ नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक डेल्टा प्लसचे २२ रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी देशात डेल्टा प्लसची कमी प्रकरणे कमी आहेत. मात्र, ही प्रकरणे वाढणार नसल्याचे सांगू शकत नाही, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा-VIDEO: जवानांनी दहशतवाद्यांना अशी दिली अखेरची संधी, १ ठार १ शरण

महाराष्ट्रात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) संचालक सुजीत सिंह म्हणाले, की महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २२ रुग्ण आढळले आहेत. तर तामिळनाडूमध्ये ९, मध्य प्रदेशमध्ये ७, केरळमध्ये ३, पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येक दोन, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

  • डेल्टा प्लस विषाणूने घेतला राज्यातील पहिला बळी -

रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील पहिला डेल्टा प्लस विषाणूने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही संगमेश्वरमधील आहे. मृत महिलेचे वय हे 80 वर्ष होते. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लस विषाणूची लागण होण्यापूर्वी या महिलेला इतरही आजार होते. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.