ETV Bharat / bharat

Jacqueline Fernandez ED Inquiry : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा होणार चौकशी - जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा होणार चौकशी

दिल्ली पोलिसांच्या ( Delhi Police ) आर्थिक गुन्हे शाखेने ( Economic Offenses Wing of Delhi Police) पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ( Actress Jacqueline Fernandez ) चौकशीसाठी बोलावले आहे. जॅकलीनची चौकशीसाठी हजर राहण्याची ही दुसरी वेळ आहे. कथित ठग सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar ) संबंधित खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Jacqueline Fernandez
जॅकलिन फर्नांडिस
author img

By

Published : Sep 19, 2022, 10:13 AM IST

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ( Actress Jacqueline Fernandez ) आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कथित ठग सुकेश चंद्रशेखरच्या खंडणीच्या प्रकरणात ( Sukesh Chandrasekhar extortion case ) चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणातील तिच्या कथित भूमिकेवर दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावण्याची ही दुसरी वेळ असल्याची माहिती दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चौकशी दरम्यान पिंकी इराणीही उपस्थित : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फर्नांडिस यांना सोमवारी सकाळी 11 वाजता मंदिर मार्गावरील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला काही कागदपत्रे तपासण्याची गरज आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भात अधिक चौकशी करण्याचीही गरज आहे. गेल्या बुधवारी जॅकलिन फर्नांडिसची 8 तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पिंकी इराणीही उपस्थित होती.

पत्नी आदिती सिंग यांचाही समावेश : पिंकी इराणीने जॅकलिन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर प्रभावशाली लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यात फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांचाही समावेश आहे.

कोट्यवधी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) 17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात चंद्रशेखरचा समावेश असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसला आरोपी म्हणून नाव दिले. ईडीच्या म्हणण्यानुसार फर्नांडिस आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही यांनी चंद्रशेखरकडून महागड्या कार आणि इतर भेटवस्तू घेतल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.