ETV Bharat / bharat

ट्रॅक्टर रॅली हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल; दीप सिद्धूसह 16 जण आरोपी

author img

By

Published : May 21, 2021, 4:17 PM IST

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅली हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केले आहे. कृषी आंदोलनात सहभागी असलेल्या काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावला होता. हे आरोपपत्र तीस हजारी कोर्टात दाखल करण्यात आले आहे. यात अभिनेता दीप सिद्धूसह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

ट्रॅक्टर रॅली हिंसाचार
ट्रॅक्टर रॅली हिंसाचार

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅली हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केले आहे. कृषी आंदोलनात सहभागी असलेल्या काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावला होता. हे आरोपपत्र तीस हजारी कोर्टात दाखल करण्यात आले आहे. यात अभिनेता दीप सिद्धूसह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ताबा मिळवला, तेव्हा दीप सिद्धूने फेसबुक लाईव्हही केले होते. त्यानंतर त्याचे नाव चर्चेत आले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दीप सिद्धूला ताब्यात घेतले होते. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. नियोजित मार्गावरून ट्रॅक्टर रॅली सुरू होती. मात्र, दीप सिद्धूने भडकावल्याने आंदोलकांनी लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला. लाल किल्ल्यावर आंदोलक जाण्यास दीप सिद्धूच जबाबदार असल्याचा आरोप आहे. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब हा धार्मिक ध्वज फडकावला होता.

लाल किल्ल्याचा मिळवला होता ताबा -

लाल किल्ल्यावर ताबा घेतल्यानंतर आंदोलकांनी तेथे तोडफोड केली. तसेच पोलिसांवरही हल्ला केला. किल्ल्याच्या परिसरात ट्रॅक्टर फिरवत धुडगूस घातला होता. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पोलिसांनी शेकडो आंदोलकांना हिंसाचार केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. तर अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. आता तब्बल चार महिन्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दीप सिद्धू भाजपाचा एजंट -

दीप सिद्धू हा भाजपाचा एजंट असून त्याला आंदोलन बदनाम करण्यासाठी भाजपानेच घुसरल्याचे शेतकरी नेते म्हणाले होते. दरम्यान, अनेक भाजपा नेत्यांनीही दीप दीप सिद्धूशी संबध नसल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान मोदी, दीप सिद्धू आणि अभिनेता आणि खासदार सनी देओल यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. कृषी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी शेतकऱ्यांविरोधात भाजपाने हा कट रचल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता.

300 पोलीस जखमी -

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. नियोजित मार्गावरून न जाता आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडत शहरातील विविध भागात प्रदर्शन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांच्या हल्ल्यात 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती.

३७ शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल -

ट्रक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारास शेतकरी नेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्वराज इंडिया संघटनेचे अध्यक्ष योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, भारतीय किसान युनियन हरयाणा विभागाचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांच्यासह ३७ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. भारतीय दंड विधानच्या विविध कलमांखाली शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.