नवी दिल्ली : दिवाळीच्या दिवशी दिल्ली जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. फटाक्यांमुळे दिल्लीची हवा विषारी झाली आहे. देशाची राजधानी असलेली दिल्ली दिवाळीच्या दिवशी जगातल्या प्रदूषणाची राजधानी ठरली आहे. दिल्लीतील प्रदुषणाची पातळीआधीच वाढलेली आहे. दिवाळीनिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्विस संस्थेच्या IQAir नुसार सोमवारी ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले.
हिवाळा सुरू झाला की देशातील मोठ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावू लागते. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसला आहे. विषारी हवेमुळे लोकांना श्वास घेणे कठीण होत आहे. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळेही हवेतील प्रदूषण झपाट्याने वाढत आहे.
दिल्ली-एनसीआरच्या प्रमुख भागांची प्रदूषण पातळी
दिल्ली-एनसीआर भागात | प्रदूषण स्तर |
---|---|
आरके पुरम | 360 |
सिरी फोर्ट | 335 |
आईटीओ, दिल्ली | 331 |
अलीपुर, दिल्ली | 308 |
पंजाबी बाग, दिल्ली | 336 |
आया नगर, दिल्ली | 317 |
लोधी रोड, दिल्ली | 317 |
CRRI मधुरा रोड, दिल्ली | 347 |
पूसा, दिल्ली | 322 |
जेएलएन स्टेडियम, दिल्ली | 347 |
नेहरू नगर, दिल्ली | 371 |
अशोक विहार, दिल्ली | 330 |
सोनिया विहार, दिल्ली | 304 |
विवेक विहार, दिल्ली | 324 |
ओखला फेस टू, दिल्ली | 345 |
शादीपुर, दिल्ली | 298 |
वजीरपुर, दिल्ली | 304 |
बवाना, दिल्ली | 311 |
श्री औरोबिंदो मार्ग | 347 |
लोनी, गाज़ियाबाद | 369 |
इंदिरापुरम, गाज़ियाबाद | 312 |
सेक्टर 62, नोएडा | 334 |
सेक्टर 1, नोएडा | 317 |
सेक्टर 116, नोएडा | 349 |
सेक्टर 125, नोएडा | 278 |
तज्ज्ञांच्या मते : जेव्हा हवेचा दर्जा निर्देशांक शून्य ते 50 मधील AQI ‘चांगला’ मानला जातो. तर 51 ते 100 ‘समाधानकारक’ मानले जातात. तर 101 ते 200 ची’मध्यम आणि 201 ते 300 घातक श्रेणीत वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या शहराचा AQI 301 ते 400 च्या दरम्यान असेल तर तेथील हवा विषारी असते. आणि 401 ते 500 अति गंभीर मानले जातात. तर तज्ज्ञांच्या मते, हवेतील सूक्ष्म कण ओझोन, सल्फर डायऑक्साइड, नायट्रिक डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि डायऑक्साइड या सर्वांमुळे श्वसनमार्गात जळजळ, अॅलर्जी आणि फुफ्फुसांचे नुकसान होते.
प्रदूषण वाढल्यावर घ्या ही खबरदारी
- लहान मुले, वृद्ध आणि दम्याच्या रुग्णांनी सकाळ-संध्याकाळ फिरू नये.
- मास्क लावूनच घराबाहेर पडा.
- अस्थमाच्या रुग्णांनी इनहेलरचा नियमित वापर करावा.
- दम्याच्या रुग्णांनी औषध नियमित घ्यावे.
- संध्याकाळी गरम पाण्याची वाफ घ्या.
- घसा खवखवल्यास कोमट पाण्याने पिणे.