नवी दिल्ली Delhi Liquor Scam : दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची चौकशी करण्यात येणार आहे. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना नोटीस पाठवून 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वी सीबीआयने एप्रिलमध्ये दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्यात आली होती. दारु घोटाळ्यातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फेब्रुवारीपासून तिहार तुरुंगात आहेत. सोमवारीच त्यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला होता.
६ वेळा जामीन अर्ज फेटाळला : याआधी दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयानेही ६ वेळा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारीच मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या जामिनावर निर्णय देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यात ३३८ कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असल्याचे म्हटलं होतं. अशा स्थितीत जामीन कसा मिळणार?
आपचा केंद्रावर हल्ला : मुख्यमंत्री केजरीवाल यांना नोटीस मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीने (आप) (Aam Aadmi Party) केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. सरकारच्या ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवला आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, केंद्र सरकारचे एकच उद्दिष्ट आहे, आम आदमी पार्टीचा नाश करणे. यासाठी ते खोटे केस तयार करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून आम आदमी पक्षाचा नाश करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.
केजरीवाल यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ : मुख्यमंत्र्यांना ईडीच्या नोटीसवर, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या टिप्पणीनंतर दारू घोटाळ्याप्रकरणी मनी ट्रेल स्थापित झाला आहे. केजरीवाल यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. न्यायालयाच्या टिप्पण्या म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या सर्व नेत्यांना चपराक आहे, जे वारंवार सांगत आहेत की, दारू घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा कोणताही पुरावा नाही. तसेच हे एक काल्पनिक प्रकरण आहे.
हेही वाचा -
- Arvind Kejriwal Met Sharad Pawar : केजरीवाल-पवार भेट; 'देशातील लोकशाही वाचवण्यासाठी शरद पवार संकटमोचक ठरतील'
- Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray : अरविंद केजरीवाल-उद्धव ठाकरेंची भेट; सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हणा, भाजपवर हल्लाबोल
- Anurag Thakur : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा केजरीवाल यांना सवाल, पाहा व्हिडिओ