ETV Bharat / bharat

Shehla Rashid: जेएनयूची माजी नेता शेहला रशीद अडचणीत, सैन्याच्या विरोधातील ट्विट भोवणार.. खटला चालवण्यास परवानगी - Shehla Rashid Tweet On Indian Army

Shehla Rashid: दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना Delhi LG Vinay Kumar Saxena यांनी JNU विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा आणि AISA च्या सदस्या शेहला रशीद शोरा यांच्यावर भारतीय लष्कराविरोधात ट्विट केल्याबद्दल खटला चालवण्यास मंजुरी दिली Delhi LG VK Saxena approves sedition case आहे. उपराज्यपालांच्या कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, ट्विटचा उद्देश वेगवेगळ्या गटांमधील शत्रुत्व वाढवणे आणि सौहार्द बिघडवणे हा आहे. काश्मीरमधील रहिवासी शेहला रशीदने भारतीय लष्कराविषयी दोन ट्विट केले आहेत.

Shehla Rashid
शेहला रशीद
author img

By

Published : Jan 10, 2023, 1:02 PM IST

Updated : Jan 10, 2023, 2:42 PM IST

नवी दिल्ली : Shehla Rashid: जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिच्या विरोधात खटला चालवण्यास दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना Delhi LG Vinay Kumar Saxena यांनी मंजुरी दिली Delhi LG VK Saxena approves sedition case आहे. रशीद ही तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असते. 18 ऑगस्ट 2019 रोजी शेहलाने भारतीय लष्कराबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली होती. शेहला रशीदने एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करून भारतीय लष्करावर काश्मिरी लोकांवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता.

काय म्हटले होते शेहलाने ट्विटमध्ये: पहिले ट्विट- सशस्त्र दल रात्रीच्या वेळी घरात घुसतात, मुलांना उचलतात, घरांची तोडफोड करतात, मुद्दाम जमिनीवर रेशन टाकतात, तांदळात तेल मिसळत असतात. दुसरे ट्विट - शोपियानमध्ये 4 जणांना लष्कराच्या छावणीत बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या किंकाळ्या ऐकून संपूर्ण परिसर घाबरून जावा, यासाठी त्यांच्याजवळ एक माईक लावण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, भारतीय लष्कराने शेहला रशीदचे आरोप फेटाळून लावत निराधार असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्कराने म्हटले होते की, 'अशा असत्यापित आणि खोट्या बातम्या लोकांना भडकवण्यासाठी विरोधी घटक आणि संघटना पसरवतात.' वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी शेहला रशीदच्या वरील ट्विटबाबत तक्रार केली sedition case against Shehla Rashid होती. Shehla Rashid Tweet On Indian Army

कोण आहे शेहला रशीद?: फेब्रुवारी 2016 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप झाला. तेव्हा शेहला रशीद जेएनयूच्या उपाध्यक्ष होत्या आणि कन्हैया कुमार अध्यक्ष होता. देशविरोधी घोषणांच्या आरोपांनी घेरलेल्या कन्हैयाला तुरुंगात जावे लागले. मात्र शेहला रशीद बचावली. त्याचवेळी कन्हैया कुमारसह विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर आरोप झाल्यानंतर ती बोलकी झाली. पोलीस मुख्यालयापासून विविध ठिकाणी झालेल्या निदर्शनांमध्ये तिचा सहभाग होता. कन्हैया कुमारवर अनेक आघाड्यांवर लावण्यात आलेले आरोप फेटाळण्यासोबतच विरोधी गटातील विद्यार्थी संघटनेलाही तिने गोत्यात उभे केले होते. त्याचा तपास अजूनही सुरू आहे.

शेहला रशीदने जेएनयूमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर एनआयटी श्रीनगरमधून इंजिनीअरिंग केले. यानंतर शेहलाने इंजिनिअर म्हणूनही काम केले. नोकरीत असताना तिचा लवकरच भ्रमनिरास झाला, त्यानंतर तिने राजकारणातही प्रवेश केला. मात्र येथे तिला यश मिळाले नाही. ऑगस्ट 2019 मध्ये जेव्हा काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले तेव्हा शेहला रशीद यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर अनेक वादग्रस्त विधाने करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल तिने अनेक मंचांवर निषेध नोंदवला आहे. Who is Shehla Rashid

मध्यंतरी ट्विट केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शेहलाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. भारतीय लष्करानेही स्पष्टीकरण देताना सर्व आरोप फेटाळून लावले होते. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. शेहलाविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवायचा की नाही यासंदर्भात सरकारने पाठवलेल्या फाईलवर आता नायब राज्यपालांनी शेहलाविरुद्ध खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.

Last Updated : Jan 10, 2023, 2:42 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.