ETV Bharat / bharat

आता दिल्लीकरांना मिळणार इंग्रजीचे धडे; इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करण्याची केजरीवालांची घोषणा

दिल्लीतील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या ( Aap spoken English course announcement ) घोषणांमुळे मुख्यमंत्री केजरीवाल हे नेहमी चर्चेत असतात. यंदा त्यांनी इंग्लिश स्पिकिंग संबंधी एक घोषणा ( Spoken English course announcement Arvind Kejriwal ) केली आहे. त्यांचे सरकार शहरातील 50 केंद्रांवर स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू करणार आहे.

Delhi govt to start spoken English course
स्पोकन इंग्रजी कोर्स घोषणा केजरीवाल
author img

By

Published : Jul 24, 2022, 2:14 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या ( Aap spoken English course announcement ) घोषणांमुळे मुख्यमंत्री केजरीवाल हे नेहमी चर्चेत असतात. यंदा त्यांनी इंग्लिश स्पिकिंग संबंधी एक घोषणा ( Spoken English course announcement Arvind Kejriwal ) केली आहे. त्यांचे सरकार शहरातील 50 केंद्रांवर स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू करणार आहे. 16 ते 35 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती आणि ज्याने 12 वी पूर्ण केली आहे तो या कार्यक्रमाचा भाग असू शकेल, अशी माहिती ऑनलाईन पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल यांनी दिली. तरुणांसाठी हा कोर्स फायदेशीर ठरणार असल्याचे केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - Celebration At Panipat : नीरजच्या यशानंतर गावात जल्लोष, आई म्हणाली चुरमा करून खाऊ घालणार

लाख लोकांची नोंदणी करणार - पहिल्या टप्प्यात, आम्ही 50 केंद्रांवर हा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. येथे एक लाख लोकांची नोंदणी केली जाईल. 18 - 35 वर्षे वयोगटातील आणि इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेला कोणीही या कार्यक्रमाचा भाग होऊ शकतो. या कोर्समुळे त्यांना नोकऱ्या मिळतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, असे केजरीवाल म्हणाले.

कोर्ससाठी फी घेणार नाही, पण.. - या कोर्ससाठी फी घेणार नाही असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी एक अट देखील घातली आहे. कोर्सची फी नाही पण सुरुवातीला लोकांना सिक्युरिटी मनी म्हणून 950 रुपये जमा करावे लागतील. पूर्ण उपस्थितीसह कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पैसे परत केले जातील. कोर्सचा कालावधी तीन ते चार महिन्यांचा असेल आणि काम करणार्‍या लोकांसाठी वीकेंड आणि संध्याकाळच्या शिफ्टचे पर्याय देखील असतील, अशी माहिती देखील केजरीवाल यांनी दिली.

प्रवेश घेण्यासाठी इंग्रजीचे मुलभूत ज्ञान आवश्यक - अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी इंग्रजीचे मुलभूत ज्ञान आवश्यक असेल आणि या कार्यक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांनी इयत्ता 8 वी पर्यंत भाषेचा अभ्यास केलेला असावा. सरकारचे दिल्ली स्किल एन्टरप्रेण्यूअरशिप विद्यापीठ हा अभ्यासक्रम चालवेल. तसेच मुल्यांकन केंब्रिज विद्यापीठाकडून केले जाणार असल्याने हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम असेल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

केंब्रिज विद्यापीठ मुल्यांकन करेल - निवेदनात केजरीवाल यांनी या कोर्सचा सर्वांना फायदा होणार असल्याचे म्हटले आहे. सरकारच्या लक्षात आले आहे की, निम्न-मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना इंग्रजी बोलण्यात आणि या कमतरतेमुळे नोकरी मिळवण्यात अडचणी येते. दिल्लीच्या तरुणांना या कोर्सचा चांगला फायदा होईल. देशातील सर्व मुलांना चांगले शिक्षण देण्याचे आमचे स्वप्न आहे. वंचित मुलांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये. हा अभ्यासक्रम त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे केजरीवाल यांनी निवेदनात म्हटले आहे. दिल्ली सरकार या कार्यक्रमासाठी मॅकमिलन आणि वर्ड्सवर्थ यांच्याशी करार करणार आहे. केंब्रिज विद्यापीठ या कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचे मुल्यांकन करेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - Minor girl abortion : बलात्कार पीडित 14 वर्षीय मुलीला गर्भपाताची परवानगी, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.