ETV Bharat / bharat

Delhi Crime News : पतीच्या मृत्यूनंतर एकजण करत होता बलात्कार, महिलेने केले असे काही.. - महिलेने तिच्यावर बलात्कार करणाऱ्याची हत्या केली

पतीच्या मृत्यूनंतर एका महिलेच्या नातलगाने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी महिलेने तिच्या मैत्रीणीच्या पतीच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केली. (women killed man in delhi) (Delhi Crime News)

Delhi Crime News
दिल्ली क्राईम न्यूज
author img

By

Published : Jul 17, 2023, 5:28 PM IST

नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील शास्त्री पार्क पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी हत्येप्रकरणी महिलेसह दोन आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण : प्रकरण असे आहे की, पतीच्या मृत्यूनंतर महिलेच्या नातलगाने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. यामुळे व्यथित झालेल्या महिलेने मैत्रीणीच्या पतीच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेली आरोपी महिला उत्तर प्रदेशातील बदायूं येथील रहिवासी आहे. तर तिचा साथीदार इरफान हा शास्त्री पार्क दिल्लीचा रहिवासी आहे.

धारदार शस्त्राने हत्या केली : पोलिसांना रविवारी सकाळी साडेआठ वाजता शास्त्री पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील बेला फार्म हाऊसजवळ एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. मृताच्या अंगावर शर्ट नव्हता तर मानेवर व पोटावर खोल जखमेच्या खुणा होत्या. मृतदेहाजवळ अशी कोणतीही वस्तू सापडली नाही ज्यामुळे त्याची ओळख पटू शकेल. मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याद्वारे संशयित आरोपी आणि मृत दोघांची ओळख पटली. 20 वर्षीय अबुजर असे मृताचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील कासगंज येथील रहिवासी आहे.

महिलेवर अनेकदा बलात्कार केला होता : आरोपी महिलेच्या पतीचे जानेवारी 2023 मध्ये आजारपणामुळे निधन झाले होते. अबुजर हा तिच्या नवऱ्याचा नातेवाईक होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, अबुजरने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. पतीच्या मृत्यूनंतर यामध्ये वाढ झाली होती. या महिलेला अबुजरपासून स्वातंत्र्य हवे होते. त्यासाठी तिला तिच्या मैत्रिणीचा पती इरफानने मदत करण्याचे मान्य केले.

पुढील तपास सुरू : घटनेच्या दिवशी यमुना नदीला आलेला पूर पाहण्यासाठी अबुजर बेटा फार्मजवळील एका ठिकाणी आला होता. तेथे महिलेने व इरफानने त्याला पकडून त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बेला फार्म येथील भिंतीच्या मागे फेकून दिला. पोलीस म्हणाले की, हत्येसाठी वापरलेला चाकू घटनास्थळाजवळून जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Body Buried In House : पालकांनी घरातच पुरला मुलीचा मृतदेह, घटनेने परिसरात खळबळ
  2. Thane Crime News : कॉलगर्लचा नाद जीवावर बेतला, ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या; वाचा काय आहे प्रकरण
  3. Delhi Crime News : श्रद्धा हत्याकांडासारख्या आणखी एका घटनेने हादरली दिल्ली, मृतदेहाचे तुकडे करून नदीकिनारी फेकले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.