डेहराडून/नवी दिल्ली: उत्तराखंडच्या हरिद्वार, रूडकी आणि कोटद्वार मध्ये बनावटच रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती केली जात होती. या कंपनीवर दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून हा बनावट इंजेक्शन निर्मितीचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका महिलेसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे बनावट इंजेक्शन कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांना पंचवीस हजार रुपयाला एक असे विकत होते.
या टोळीने आतापर्यंत तब्बल दोन हजार बनावट इंजेक्शनची विक्री केली आहे. दिल्ली पोलीस कमिशनर श्रीवास्तव यांनी ट्विट करून या कारवाईची माहिती दिली आहे.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार त्यांना काही दिवसांपूर्वी सूचना मिळाली होती, की रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वीही अनेक टोळ्या गजाआड केल्या आहेत. अशाच प्रकारे काळा बाजार करणारी एक टोळी दिल्लीतील बत्रा हॉस्पिटल परिसरात गेल्याच आवडयात जेरबंद केली होती.
या कारवईत पोलिसांनी दोन आरोपी मोहन झा आणि मोहम्मद शोएबला अटक केली होती. त्यांच्याकडून रेमडेसिवीरचे 10 वायल हस्तगत केले होते. त्यावेळी त्या आरोपींनी त्यांना सांगितले होते की ते एका महिलेच्या माध्यमातून हे बनावट इंजेक्शन रुग्णालयाच्या बाहेर विक्री करत होते. एक इंजेक्शन 25 ते 40 हजार रुपांपर्यंत विक्री केली जायची. या माहितीनंतर दिल्ली पोलिसांनी दिल्लीतून त्या महिलेसह दोन आरोपींना अटक केली.
महिलने केला खुलासा, उत्तराखंडमध्ये छापेमारी
या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान महिलेने पोलिसांना सांगितले की उत्तराखंडमधील रूडकी येथे राहणाऱ्या वतन सिंह यांच्याकडून हे इंजेक्शन घेत होती आणि पुढे विक्रीसाठी त्याचे वाटप केले जायचे. त्या दिल्ली पोलिसांची एक टीम उत्तराखंडला रवाना झाले तेथून वतन सिंह याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ररेमडेसिवीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आले.
मात्र ते इंजेक्शन बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवून चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की, तो कोटद्वार येथे हे बनावट इंजेक्शन तयार करून रुग्णांच्या नातेवाईकांना विकत होता. यासाठी त्याने जनतेत आपला मोबाईल नंबर देखील पसरवला होता.
कोटद्वारमधून फॅक्टरीचा पर्दाफाश
या माहितीसह गुन्हेशाखेच्या पथक वतन सिंह सोबत कोटद्वारमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी इंजेक्शन निर्मितीच्या फॅक्टरीवर छापा टाकला. ज्यामध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन तयार केले जात होते. येथून पोलिसांना रेमडेसिवीरचे 200 बनावट डोस आढळून आले. या शिवाय इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले. आरोपींनी पोलिसांना सांगितले की त्यांनी आतापर्यंत दोन हजार डोसची विक्री केली आहे. उत्तराखंड यापूर्वीही वतन सिंहची फॅक्टरी सील केली होती
अशी करा रेमडेसिवीरची खात्री
खात्रीशीर रेमडेसिवीर इंजेक्शनक्या बाटलीवर Rx लिहलेले असते. नकली औषधांवर हे लिहलेले नसते.
रेमडेसिवीरक्या बाटलीवर लाल रंगाचे खबरदारी दर्शविणारे लेबल असते.
बनावट औषधांवर इंडिया हे india असे लिहलेले असते (India बरोबर) आय हे कॅपिटल अक्षरात लिहलेले नसते.