नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने (Film Actress Jacqueline Fernandez) अबू धाबी, यूएई, नेपाळ आणि फ्रान्सला १५ दिवसांच्या तातडीच्या प्रवासासाठी पासपोर्ट जारी करण्याची मागणी आहे. जॅकलीनच्या अर्जावर दिल्ली न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून उत्तर मागितले आहे.
सुकेश चंद्रशेखरचा (Sukesh Chandrashekhar) समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग तपासात चौकशीसाठी ती यापूर्वी तपास संस्थेसमोर हजर झाली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी बुधवारी तपास एजन्सीकडून उत्तर मागितले. याची पुढील सुनावणी 18 मे 2022 ला होईल.
याचिकेत काय म्हटले आहे
फर्नांडीझ 2009 पासून भारतात राहणारी श्रीलंकेची नागरिक आहे. आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तिचे चांगले नाव आहे. जॅकलीनचे वकील अजित सिंग यांनी सांगितले की, ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे आणि सध्याच्या प्रकरणात अर्जदाराचे नाव आरोपी म्हणून दिले नाही. कोणतेही कारण न सांगता ईडीने अर्जदाराचा पासपोर्ट जप्त केला आहे.
आयफासाठी जाण्याची परवानगी
याचिकेत म्हटले आहे की, जॅकलीन फर्नांडिस प्रसिध्द अभिनेत्री असल्याने तिला कार्यक्रम, पत्रकार परिषद, तालीम आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. पुरस्कार सोहळ्यानिमित्त परदेशात जायचे असल्याने त्यांनी पासपोर्ट देण्याची मागणी केली आणि आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार आयोजित करत असल्याने 17 मे 2022 ते 22 मे 2022 या कालावधीत अबू धाबी, UAE येथे जाण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली. अबू धाबी, UAE मध्ये 2022 IFA वीकेंड आणि पुरस्कार आहेत.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करणार प्रतिनिधित्व
जॅकलीन फर्नांडिस ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलीवूडचे प्रतिनिधित्व करते. फ्रान्समध्ये 17 मे 2022 ते 28 मे 2022 या कालावधीत सहभागी होण्यासाठी तिला आमंत्रित करण्यात आले आहे. 2017 पासून दबंग शोसाठी नेपाळमध्ये 27 मे 2022 ते 28 मे ला जायचे आहे.
हेही वाचा - Actress Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडीसने चाहत्यांना केले गोपनीयता पाळण्याचे आवाहन