नवी दिल्ली - दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कुमार ( Congress Leader Anil kumar Wrote Letter To Anna Hajare ) यांनी अण्णा हजारे यांना पत्र लिहिले आहे. अनिल कुमार यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejriwal ) यांना अण्णा हजारे ( Anna Hajare ) यांचे लाडके असे वर्णन केले आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारच्या दारू विषयीच्या नव्या धोरणांविरोधात दिल्लीत आंदोलन करण्याची विनंती त्यांनी अण्णा हजारे यांना केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वाईन धोरणाविरोधात अण्णा हजारे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
पत्रात काय म्हणाले अनिल कुमार -
गेल्या सात वर्षांत केजरीवाल यांनी जनतेच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. दिल्लीतील बेरोजगारीने आतापर्यंतचा उच्चांक ओलांडला आहे. 22 हजार अस्थायी शिक्षक अजूनही काम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये दिल्लीत बेरोजगारीसोबत भ्रष्टाचारही वाढला आहे, असे अनिल कुमार यांनी अण्णांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. अनिल कुमार यांनी अण्णा हजारे यांना पत्राच्या माध्यमातून आठवण करून दिली की, त्यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर केलेल्या आंदोलनामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या असक्षम व्यक्तीला दिल्लीचे मुख्यमंत्रीपद मिळाले. ज्यांनी या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्व केले होते, त्यांनी दिल्लीचा कारभार पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. दिल्ली भ्रष्टाचारात बुडाली आहे. केजरीवाल यांच्या नवीन दारू धोरणामुळे आज दारू माफिया नवीन उंची गाठत आहेत, तर दिल्लीतील सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडत आहे, असेही अनिल कुमार म्हणाले.
हेही वाचा - Punjab Assembly Election 2022 : आम्ही भाऊ बहिण एकमेकांसाठी जीव देऊ शकतो - प्रियांका गांधी