ETV Bharat / bharat

दिल्ली सरकारकडून हुतात्मांच्या ६ कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर - दिल्ली सरकार मदत

हौतात्म्य प्राप्त झालेल्यामध्ये भारतीय हवाई दलामधील तीन, दिल्ली पोलिसामधील दोन आणि नागरी सुरक्षेमधील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. पत्रकार परिषदेमध्ये मनीष सिसोदिया यांनी हुतात्म्यांची नावे जाहीर केली आहेत.

Manish Sisodiya
मनीष सिसोदिया
author img

By

Published : Jun 19, 2021, 7:46 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली सरकारने देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या पोलीस, सैन्यदल आणि नागरी सुरक्षा रक्षकांच्या ६ कुटुंबाकरिता प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. शूर अशा हुतात्म्यांचा गौरव करण्याकरिता व त्यांच्या कुटुंबांचे मनोधैर्य उंचाविण्याकरिता ही मदत जाहीर केल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ऑनलाईन परिषदेत सांगितले.

हौतात्म्य प्राप्त झालेल्यामध्ये भारतीय हवाई दलामधील तीन, दिल्ली पोलिसामधील दोन आणि नागरी सुरक्षेमधील एकाचा समावेश आहे. पत्रकार परिषदेमध्ये मनीष सिसोदिया यांनी हुतात्म्यांची नावे जाहीर केली आहेत.

martyrs list
हुतात्म्यांची यादी

हेही वाचा- पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ ५ दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन, आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार

  • दिल्ली पोलीस एसीपी संकेत कौशिक

एसीपी संकेत कौशिक हे वा वाहनांची तपासणी करताना त्यांना ट्रकने धडक दिली. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. कौशिक यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत.

  • हवाई दलाचे अधिकारी राजेश कुमार-

राजेश कुमार यांचा अरुणाचल प्रदेशमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. ते दिल्लीमधील सफदरजंगमधील रहिवाशी होते. लग्नानंतर तीनच महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात घरात कोणीही कमविणारे नाही.

हेही वाचा- काका-पुतण्यासमोर काँग्रेस नेत्यांना किंमत नाही - पडळकर

  • फ्लाईट लेफ्टनंट सुनीत मोहंती

द्वारकामधील सुनीत मोहंती हे रहिवाशी होते. त्यांचा जोरहाट येथील विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहिण आहे.

हेही वाचा- पूर नियंत्रण : जयंत पाटील यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा; 'हा' झाला निर्णय

  • स्क्वाड्रन लीडर मित कुमार

मित कुमार हे अशोक विहारमधील रहिवाशी होते. हिमाचल प्रदेशमधील कांग्रा येथील मिग-२१ च्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

  • दिल्लीचे पोलीस कॉन्स्टेबल विकास कुमार

पोलीस कॉन्स्टेबल विकास कुमार हे वसंत विहारमध्ये वाहनांची तपासणी करत होता. त्यावेळी चारचाकीने कुमार यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या विकास कुमार यांचा मृत्यू झाला.

  • नागरी सुरक्षा अधिकारी प्रवेश कुमार

भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने नागरी सुरक्षा अधिकारी प्रवेश कुमार यांचा मृत्यू झाला.

देशातील शूर अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कायम राहण्यासाठी ही मदत जाहीर केल्याचे सिसोदिया यांनी सांगितले. त्यांचा सरकार आणि समाजावर विश्वास राहणे आवश्यक आहे. जर त्यांच्याबाबत दुर्दैवाने काही घडले तर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल, असे सिसोदिया यांनी नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.