नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा 99.37 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात उच्च निकाल आहे. याचबरोबर 6149 (0.47) जणांचे निकाल प्रतीक्षेत ठेवण्यात आलेले आहेत.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बारावीच्या परीक्षा आयोजित करणे शक्य नव्हते. त्यामुळे CBSE ने 12 वीच्या विद्यार्थांचा निकाल जाहीर करण्यासाठी मुल्यांकन पद्धती लागू केली होती. या मुल्यांकन पद्धतीच्या आधारे CBSE आज दुपारी 2 वाजता याववर्षीचा निकाल जाहीर झाला आहे.
CBSE च्या अधिकृत वेबसाइट www.cbse.nic.in वर आपल्याला निकाल पाहता येईल. याबरोबर परीक्षेचे निकाल हे डिजी लॉकरवर देखील अपलोड करण्यात येणार आहे.
मुलींचीच बाजी
अपेक्षेप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलीनीच परिक्षेत बाजी मारली आहे. यावर्षी मुलांपेक्षा मुली 0.54 टकक्यांनी पुढे राहिल्या. मुलींचा 99.67% तर मुलांचा 99.13% होता. 12वीच्या निकालात सलग सहाव्या वेळेस मुलींनी बाजी मारली आहे. याचबरोबर तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला.
मागच्या वर्षीपेक्षा 17 दिवसांनी लागला उशिरा
मागच्या वर्षी बारावीचा निकाल 13 जुलैला जाहीर केला होता. मात्र, यंदा निकाल मागच्या वर्षीपेक्षा 17 दिवस उशिराने लागला आहे. यंदा कोरोनामुळे बोर्डाने 12वीची परिक्षा रद्द् केली होती. मूल्यांकन पध्दतीने थोडा उशीर झाल्याने निकाल 30 जुलैला घोषित करण्यात आला. यामुळे यंदा गुणवान विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार नाही.
काय होती मूल्यांकन पध्दती
यावेळचा 12 वीचा निकाल 30:30:40 अशा पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 10 ते 11 वी मधील सर्वात जास्त गुण असलेले पाचपैकी तीन विषय यासाठी निवडण्यात आले आहेत. 12 चे गुण प्रात्याक्षिक आणि लेखी परिक्षांवरच मूल्यांकन केले आहे. 10 आणि 11 वीच्या गुणांना 30 टक्के गुण तर 12 वीच्या 40 टक्के गुण दिले आहेत.
असा पाहता येईल आपल्याला निकाल
- परीक्षा क्रमांक माहिती असणे गरजेचे -
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यावर्षी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या दहावी, बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर केले आहेत. दोन्ही वर्गांसाठी परीक्षा घेण्यात आल्या नसल्यामुळे मंडळाकडून प्रवेशपत्रे जाहीर करण्यात आली नाहीत. आता निकाल जाहीर करण्याच्या बोर्डात काम सुरू आहे, असे बोर्डाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक हे जाहीर केलेले आहेत. तो परीक्षा क्रमांक माहिती असणे गरजेचे आहे.
आपल्याला परीक्षा क्रमांक माहिती नसेल तर cbseit.in/cbse/2021/rfinder/landing.aspx या साईट वर आपण आपला परीक्षा क्रमांक माहिती करू शकता.
- DigiLocker वर आपण निकाल पाहत असाल तर...
सीबीएसई 12 वीचे विद्यार्थी https://cbse.digitallocker.gov.in/ चा URL चे अनुसरण करून थेट DigiLocker मध्ये खाते तयार करू शकतात.
असे करा आपले खाते तयार -
- प्रथम आधार कार्ड नुसार तुमचे नाव टाका.
- आधार कार्डनुसार आपली जन्मतारीख प्रविष्ट करा.
- आपले लिंग निर्दिष्ट करा.
- तुमचा मोबाईल क्रमांक टाका.
- 6 अंकी सुरक्षा पिन सेट करा.
- तुमचा ईमेल आयडी टाका.
- तुमचा आधार क्रमांक टाका.
- तपशील सबमिट करा.
अश्याप्रकारे आपण खाते तयार करून तुमचा निकाल पाहू शकता.
खालील वेबसाईट वर पाहा सीबीएसई 12 वीचा निकाल -
याठिकाणी सीबीएसई 12 वीचा निकाल या साईटवर पाहू शकता