ETV Bharat / bharat

Defibrillator for Heart Patients : ट्रॅफिक सिग्नल्सवर बसवली डिफिब्रिलेटर यंत्रणा; हृदयविकाराचा झटका आल्यास होणार मदत - emergency

चेन्नईतील ट्रॅफिक सिग्नल्सवर आता डिफिब्रिलेटर यंत्रणा बसवली गेली आहे. ज्यामुळे सिग्नल्सवर थांबलेल्या नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्यास त्यांचे प्राण वाचवण्यास काहीशा प्रमाणात यश येणार आहे. तामिळनाडूमध्ये प्रथमच सेम्मनचेरी पोलीस स्टेशनजवळ आणि चोलिंगनाल्लूर सिग्नलजवळ स्वयंचलीत बाह्य डिफिब्रिलेटर ठेवण्यात आले आहे.

Defibrillator for Heart Patients
डिफिब्रिलेटर यंत्रणा
author img

By

Published : Jan 13, 2023, 10:37 AM IST

चेन्नई ( तमिळनाडू ) : चेन्नईत ट्रॅफिक सिग्नल्सवर प्रवाशांसोबत कोणती दुर्घटना घडल्यास त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी एक उपाययोजना करण्यात येत आहे. रुग्णांना मदत करण्यासाठी डिफिब्रिलेटर बसवली आहेत. त्याशिवाय रस्ते अपघात आणि अन्य होणारे मृत्यू टाळण्यासाठी तामिळनाडूमध्ये ही अपाययोजना करण्यात आली आहे. प्रथमच स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर उपकरणाचा वापर तामिळनाडूत होत आहे.

2 ठिकाणी बसवले डिफिब्रिलेटर : चेन्नईतील तांबरम महापालिका पोलीस विभाग तसचे खासगी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने ही नवी उपाययोजना करण्यात येत आहे. रस्ते अपघातात बळी पडलेल्या आणि त्यातून बचावलेल्या पण जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना वाचवण्यासाठी, तामिळनाडूमध्ये प्रथमच सेम्मनचेरी पोलीस स्टेशनजवळ आणि चोलिंगनाल्लूर सिग्नलजवळ स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर ठेवण्यात आले आहे.

उपकरणाचे फायदे : रस्ते अपघात किंवा हृदयविकाराचा झटका आल्यास श्वास घेण्यास लोकांना त्रास होतो. त्रास होत असलेल्यांना प्रथमोपचार देण्यासाठी या उपकरणाची मोठी मदत होत असते. असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. हे साधन आतापर्यंत फक्त चेन्नई विमानतळ आणि चेन्नईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे. अन्य ठिकाणी वापरण्यात येणार की नाही याबाबतची माहिती समोर आलेली नाही. शहरातील जास्त रहदारी, किंवा अपघाताच्या ठिकाणी देखील ही यंत्रणा बसवण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

डिफिब्रिलेटर अमेरिकेतून आयात : तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच हे उपकरण रस्त्यावर बसवण्यात आले आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला जगण्याची केवळ 30 टक्के शक्यता असताना, या उपकरणासह उपचार केल्यास. त्याचा परिणाम जाणवतो आणि अपघातग्रस्ताच्या जगण्याचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत वाढते. जेणेकरून अपघातग्रस्ताला रूग्णालयात पोहोचवेपर्यंत त्याचा जीव वाचवला जाईल. रूग्णालयात त्याच्यावर उपचार केले जाती. डिफिब्रिलेटर हे साधन परदेशी देशांमध्ये प्रत्येक 15 किमी अंतरावर असते. हे साधन अमेरिकेतून आयात केल्याची माहिती समोर आली आहे.

सुरक्षेबाबत जनजागृती : तामिळनाडू महामार्गांवर हे उपकरण बसवण्यासाठी सेवाभावी संस्था पोलिसांसोबत काम करत आहेत. तसेच, या कार्यक्रमात चोझिंगनाल्लूर मार्गावर रस्त्याचे नियम न पाळणाऱ्यांसाठी हिंदू देव यमनेश्‍वरची वेशभूषाकरून सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त कामिनी आणि तांबरम पोलीस विभागाचे उपायुक्त कुमार उपस्थित होते.

हेही वाचा : Political Reaction : शरद यादव यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात कधीही भरून न येणारी हानी...राजकीय वर्तूळात शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.