ETV Bharat / bharat

Imran Khan Arrest: इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर! तत्काळ सोडून देण्याचे कोर्टाचे आदेश - माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर आहे असे ठरवत, त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

Imran Khan
Imran Khan
author img

By

Published : May 11, 2023, 7:58 PM IST

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असून, त्यांना तातडीने सोडा असा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इम्रान खान यांच्या अटकेसंदर्भात आज गुरुवार (11 मे)रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त करत त्यांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत.

अटक केल्यानंतर एनएबीला फटकारले : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीशांनी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर एनएबीला चांगलेच फटकारले होते. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान यांना इस्लामाबाद न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला 'पीटीआय'चे अध्यक्ष इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात हजर राहिल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल : सरन्यायाधीश उमर अता बंदियाल म्हणाले की, 'न्यायालय या प्रकरणावर खूप गंभीर आहे. या प्रकरणी न्यायालय आजच योग्य तो आदेश जारी करणार आहे' . सरन्यायाधीश बंदियाल म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून कशी काय अटक केली जाऊ शकते? न्यायालयाची एक प्रतिष्ठा असते. इम्रान खान यांच्या अटकेनंतर न्यायालयात कोणालाही सुरक्षित वाटणार नाही. न्यायालयाच्या आवारात अटक करणे ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे. हे थांबवले पाहिजे.' असेदेखील न्यामूर्तींचे खंडपीठ म्हणाले.

8 जणांचा मृत्यू 200 पेक्षा लोक जखमी : न्यायालयाच्या या भूमिकेमुळे इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच खूश झाले आहेत. इम्रान खान यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इम्रान खान यांची अटक कायदेशीर ठरवण्याऱ्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या याचिकेविरोधात पीटीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल सुरू झाली. यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. आज या जाळपोळमध्ये, आंदोलनांमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दोनशे लोकांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याने सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानवर काय परिणाम होणार? खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.