अहमदाबाद - बुधवारी दुपारी अहमदाबादमधील कापूस गिरणीत झालेल्या प्रचंड स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या एका भाग संपूर्ण तोडून काढत अग्निशमन दलाच्या जवानांनी स्फोटाच्या स्थळावरून अन्य नऊ जणांना वाचवले.
एलजी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय अधीक्षकांनी 12 जणांचे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
'स्फोटाच्या स्थळावरून नऊ जणांना मृतावस्थेत बाहेर आणण्यात आले. याशिवाय, आम्ही वाचलेल्यांपैकी नऊ जणांना रुग्णालयात दाखल केले होते,' असे रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - राम मंदिर निर्माणासाठी 78 कोटींचा निधी जमा - गोविंदगिरी महाराज
पिराना पिपलाज मार्गावरील नानू काका इस्टेट येथे मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली.
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ढिगाऱ्याखालील 18 जणांना वाचवले आणि सर्वांना अहमदाबादच्या एलजी रुग्णालयात पाठवले. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या स्फोटात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, त्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून पीडित कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त केल्या.
हेही वाचा - कापूस खरेदीत गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी शिकवला धडा; वसूल केले 51 हजार रुपये