ETV Bharat / bharat

धक्कादायक! ब्ल्यूटूथ एअरफोनचा कानात स्फोट झाल्याने राजस्थानमधील तरुणाचा मृत्यू - deadly earphones

ब्ल्यूटूथ एअरफोनचा वापर करणे हा तरुणामध्ये ट्रेण्ड आहे. वायरलेस एअरफोन वापरणे हे जीवावर बेतू शकते. अशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

ब्ल्यूटूथ एअरफोनचा कानात स्फोट
ब्ल्यूटूथ एअरफोनचा कानात स्फोट
author img

By

Published : Aug 6, 2021, 9:03 PM IST

जयपूर - तुम्हाला कानामध्ये ब्ल्यूटूथ लावण्यासी सवय असेल तर ही चिंता वाढविणारी बातमी आहे. राजस्थानमधील चौमू या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. कारण, ब्ल्यूटूथ एअरफोनचा कानात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

जयपूरमधील चौमूच्या परिसरातील उदयपुरिया गावात तरुणाच्या कानात ब्ल्यूटूथ एअरफोनचा स्फोट झाला. या घटनेत तरुणाच्या दोन्ही कानांना जखम झाली आहे. तरुणाला जखमी अवस्थेत सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा-न्यायाधीशांच्या संरक्षणाकरिता सीबीआयने काहीही केले नाही- सर्वोच्च न्यायालय

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. राकेश नागर असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांनी तरुणाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. रुग्णालयाचे डॉ. एल. एन. रुंडला यांच्या माहितीनुसार राकेश हा कानात ब्ल्यूटूथ एअरफोन लावून बोलत होतो. अचानक स्फोट होऊन दोन्ही कानात एअरफोन फुटले.

हेही वाचा-कर्नाटकमध्ये आजपासून रात्री 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू

स्फोटानंतर तरुणाला आला ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

स्फोटानंतर राकेश हा बेशुद्ध पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ब्ल्यूटूथच्या स्फोटाने मृत्यू झाल्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार कानामध्ये स्फोट झाल्यानंतर लगेचच राकेशला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-गोगरामधून भारत-चीनचे सैनिक मागे फिरले, तात्पुरते बांधकामही उद्धवस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.