नवी दिल्ली : दिल्ली विकास प्राधिकरणानं (DDA) आज रोशनारा क्लब सील केल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसलाय. डीडीएनं ही कारवाई आज सकाळी केली आहे. क्लबबरोबर असलेला भाड्याचा करार संपुष्टात आल्यानं क्लबला टाळं लावण्यात आलं आहे.
100 वर्ष जुना रोशनारा क्लब : दिल्लीतील सर्वात जुना कल्ब अशी रोशनारा क्लबची आहे. ब्रिटिशांकडून क्रिकेटला नेहमीच प्रोत्साहन देण्यात येण्यात होते. त्यामुळे 1922 मध्ये रोशनारा क्लब या नावाने ब्रिटिशांनी क्लबची स्थापना केली होती. दिल्लीतील सब्जी मंडी भागात हा क्लब आहे. क्लबबरोबरचा भाडे करार संपल्यानंतर कोर्टानं क्लब सील करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईवेळी कर्मचाऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे जवान उपस्थित होते. पोलीस दलानं क्लबच्या कोणत्याही व्यक्तीला आत जाऊ दिलं नाही.
या क्लबमध्ये बीसीसीआयची स्थापना : रोशनारा क्लबचा इतिहास क्रिकेटचे प्रेक्षक आणि खेळाडुंसाठी संस्मरणीय राहिला आहे. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) ची स्थापना 1928 मध्ये, रोशनारा क्लबमध्येच एक सोसायटी म्हणून करण्यात आली. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सराव सामना १९३१ मध्ये कल्बच्या मैदानावर झाला होता. कालांतरानं लोकप्रिय झालेले रणजी सामनेही आयोजित करण्यात आले होते.
रोशनारा दिल्ली हायकोर्टानं 6 ऑक्टोबरपर्यंत क्लब सील करण्याच्या कारवाईल स्थगिती आदेश दिला होता. मात्र, आज अचानक सकाळी अचानक मोठ्या संख्येनं आलेल्या डीडीएच्या अधिकाऱ्यांनी क्लबची इमारत सील केली. आता याप्रकरणी क्लबचे अधिकारी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची कर्मचाऱ्यांनी माहिती दिली-क्लबचे सरचिटणीस राजन मनचंदा
सुमारे 450 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड- क्लब सुमारे भव्य अशा 23.25 एकर परिसरात पसरलेला आहे. दिल्लीच्या रोशन रोडवर असलेला हा रोशनारा क्लब ल क्रिकेटच्या लोकप्रियतेसाठी मैलाचा दगड ठरला. अशा परिस्थितीत हा क्लब सील केल्यास क्रिकेटचं मोठे नुकसान होणार असल्याचं कल्बमधील कर्मचारी सांगतात. या क्लबला टाळं लावणं म्हणजे क्रिकेटसाठी काळा दिवस आहे, अशी कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या क्लबमध्ये अनेक संस्मरणीय सामने खेळल्यानं हा क्लब क्रिकेटच्या इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. दुसरीकडं क्लब बंद झाल्यानं येथे काम करणाऱ्या सुमारे 450 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
हेही वाचा-