ETV Bharat / bharat

डीडी, आकाशवाणीच्या ग्राहक संख्येत पाकिस्तानचा दुसरा क्रमांक - दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ

प्रसार भारतीच्या दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ यांच्या डिजिटल वाहिन्यांनी सर्व रेकार्ड तोडले आहेत. या वाहिन्या सर्वांत जास्त भारतामध्ये पाहिल्या गेल्या असल्या तरी पाकिस्तानमध्येही या वाहिन्यांचा मोठा ग्राहकवर्ग आहे. या डिजिटल वाहिन्यांच्या ग्राहक संख्येत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

प्रसार भारती
प्रसार भारती
author img

By

Published : Jan 4, 2021, 9:50 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. या लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरीच थांबणे बंधनकारक होते. लॉकडाउनच्या काळात घरात बसून वैतागलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी 80 आणि 90 च्या दशकातील जवळपास सर्वच मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. प्रसार भारतीच्या दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ यांच्या डिजिटल वाहिन्यांनी सर्व रेकार्ड तोडले आहेत.

ग्राहक संख्येत 2020 या वर्षात 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या वाहिन्यांना एक अब्जांहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले आहेत. सहा अब्जांहून अधिक डिजिटल मिनीटे या वाहिन्या पाहिल्या गेल्या. या वाहिन्या सर्वांत जास्त भारतामध्ये पाहिल्या गेल्या असल्या तरी पाकिस्तानमध्येही या वाहिन्यांचा मोठा ग्राहकवर्ग आहे. या डिजिटल वाहिन्यांच्या ग्राहक संख्येत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020 मध्ये शाळेतील मुलांशी संवाद साधला. त्या संवादाचा व्हिडिओ सर्वाधिक लोकप्रिय ठरला. याशिवाय प्रजासत्ताक दिन परेड 2020, डीडी नॅशनल आर्काइव्ह्ज आणि शकुंतला देवी यांचा एक दुर्मिळ व्हिडिओ हे सर्व सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल व्हिडिओंमध्ये होते. मन की बात यूट्यूब चॅनल आणि ट्विटर हँडलमध्ये फॉलोवर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. मन की बात अपडेट ट्विटर हँडलला 67,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

डीडी सह्याद्री, डीडी चंदना, डीडी बांगला आणि डीडी सप्तगिरी या वाहिन्याही टॉप २० डिजिटल वाहिन्यांमध्ये स्थान मिळवले. तर डीडी स्पोर्ट्‌स, आकाशवाणी स्पोर्ट्‌स, प्रसार भारती अर्काईव्हज्‌, डीडी किसान या वाहिन्यांवरील कार्यक्रम टॉप टेनमध्ये आहेत. देशभरातील सर्व भाषांमधील मिळून जवळपास 1500 रेडिओ वाहिन्या डीडी-एअरच्या नेटवर्कद्वारे प्रसारित केल्या जातात आणि युट्यूबवर अपलोड केल्या जातात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.