नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घेणं आणि लस आणि बुस्टर डोस हेच पर्याय आहेत. यातच भारतातील औषध नियामकने म्हणजेच DCGI ने भारत बायोटेक : इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला ( Bharat Biotech Gets Approval for Intranasal Vaccine ) परवानगी दिली आहे.
भारत बायोटेकद्वारे विकसित करण्यात आलेल्या नाकावाटे देण्यात येणारी ही लस 'बीबीवी154' (BBV154) कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना देण्यात येईल. ही पहिलीच अशी कोविड - 19 लस आहे जी भारतात मानवांवर क्लिनिकल चाचण्या करेल. दरवर्षी आपल्या कोविड-19 इंट्रानासल लसीचे एक अब्ज डोस तयार करण्याचे लक्ष्य भारत बायोटकेने ठेवले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या विश्वनाथन यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या लस वापरण्यावर भर दिला होता. नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीचा फायदा आहे की लस घेण्यासाठी दिर्घ प्रकियेतून जावे लागणार नाही. तसेच इंजेक्शनने वेदनाही होणार नाहीत, असे डॉ. सौम्या यांनी म्हटलं होतं.
इंट्रानेसल बूस्टर डोसचे फायदे -
सामान्य लसीपेक्षा नाकावाटे देण्यात येणाऱ्या लस अधिक प्रभावी असणार आहे. जेव्हा लस नाकातून दिली जाते. तेव्हा प्रथम नाकात अँटीबॉडीज तयार होतात. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत विषाणू पोहोचणे कठीण होईल. याचा परिणाम असा होईल की नाकाद्वारे लस घेणाऱ्यांच्या फुफ्फुसात विषाणू पोहोचू शकणार नाहीत, असे डॉक्टरांनी म्हटलं.
हेही वाचा - Bjp Mla Suspension quashes : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड - देवेंद्र फडणवीस