ETV Bharat / bharat

Student Death After Teacher Beaten Him माठातले पाणी पिल्याचा शिक्षकाला आला राग विद्यार्थ्याचा मारहाणीत गेला जीव - Dalit Student Death

जालोरच्या सायला पोलीस स्टेशन हद्दीतील सुराणा गावातील एका खाजगी शाळेत २० जुलै रोजी एका तिसरीच्या वर्गातील दलित विद्यार्थ्याला संतप्त शिक्षकाने एवढी बेदम मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला Dalit Student Death आहे त्या मुलाची चूक एवढीच होती की त्याने माठातील पाणी पिले होते शिक्षकाने त्याला बेदम मारल्याने तो तो गंभीर जखमी झाला होता त्याच्या कानाला आणि डोळ्याला अंतर्गत जखमा होत्या विद्यार्थ्याला उपचारासाठी अहमदाबादला नेण्यात आले होते तिथे त्याचा शनिवारी मृत्यू झाला शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे Jalore Teacher Arrested For Beating Student

Student death
Student death
author img

By

Published : Aug 14, 2022, 8:43 AM IST

जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका खाजगी शाळेतील शिक्षकाने तिसऱ्या वर्गातील दलित विद्यार्थ्याला भांड्यातले पाणी प्यायल्यानंतर एवढ्या वाईट प्रकारे मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला Student Death After Teacher Beaten Him . गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सायला पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुराणा येथील रहिवासी किशोर कुमार यांनी तक्रार दिली आणि सांगितले की, त्यांचा भाऊ देवराम यांचा मुलगा इंद्रकुमार सरस्वती विद्या मंदिर शाळेत तिसरीच्या वर्गात शिकतो. 20 जुलै रोजी इंद्रकुमार शाळेत शिकण्यासाठी गेला होता. यादरम्यान संतप्त शिक्षक चैल सिंह यांनी माठातील पाणी पिलेल्या इंद्रकुमार याला मारहाण केली. शिक्षकाने मुलाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे मुलाच्या उजव्या कानाला आणि डोळ्याला अंतर्गत जखमा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कानात असह्य वेदना होत असल्याने इंद्र कुमार याने शाळेसमोरच असलेल्या वडील देवराम यांच्या दुकानात जाऊन घटनेची माहिती दिली. यानंतर देवराम मेडिकल दुकानातून औषधे घेऊन मुलाला घरी घेऊन गेला. मुलाला जास्त वेदना होत असल्याने त्याला बगोडा, भीनमाळ, डीसा, मेहसाणा, उदयपूर या खासगी रुग्णालयात सातत्याने उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. शनिवारी उपचारादरम्यान इंद्रकुमार यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Actor Armaan Kohli अभिनेता आरमान कोहलीची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा जामिनासाठी धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.