मुंबई: दाऊद भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने एक विशेष टीम तयार केली आहे. ही टीम भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजकांना लक्ष्य करण्यासाठी तयार केली आहे. एवढेच नाही तर स्फोटके आणि घातक शस्त्रास्त्रांंच्या सहाय्याने देशामध्ये विविध भागात हिंसाचार घडवण्याची योजना दाऊदने आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबईतून हवालामार्फत पैसा ट्रान्सफर
केंद्रीय गृहमंत्रालयाने दाऊद इब्राहिम यांच्या संदर्भातील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिल्यानंतर त्याच्या विरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास सुरू केला असता दाऊद इब्राहिम संदर्भातील अनेक माहिती समोर आली. दाऊद इब्राहिम मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग करून मुंबईतून हवालामार्फत पैसा ट्रान्सफर करत असल्याची बाब समोर आल्याने एनआयए आणि ईडीने मुंबईत मंगळवारी संयुक्त छापेमारी केली होती.
रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणूक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने 2019 पासून डार्क नेटचा वापर सक्रिय केला आणि यूएई मधील हवालाच्या डिजिटल वॉलेटमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा जमा करुन रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणूक करतो अशी माहितीही ईडीला मिळाली आहे.
सर्वाधिक काळी कमाई कमावून देतो
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याचा डी कंपनीचा भारतात ड्रग्स, एक्सटॉर्शन, रिअल इस्टेट आणि सट्टेबाजीचा व्यवसाय प्रामुख्याने सक्रिय आहे. जो सट्टेबाजी आणि रिअल इस्टेट गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये केलेल्या सर्वाधिक काळी कमाई कमावून देतो आहे पैसे हवालाद्वारे डिजिटल वॉलेटमध्ये जमा होते आणि तेथून ते यूएईमधील रिअल इस्टेटमध्ये गुंतवले जाते. अशी देखील माहिती तपासात समोर आली आहे.
इक्बाल कासकर ईडीच्या कस्टडीत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपासाकरिता ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला 6 दिवस ईडी कस्टडी पाठवले आहे. इक्बाल कासकर दाऊद इब्राहिम गँगचा महत्त्वाचा सदस्य आहे. इक्बाल कासकर याचा आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेटशी सुद्धा संबंध आहे. असे न्यायालयासमोर युक्तिवाद दरम्यान सांगितले आहे. ईडीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात या सर्व प्रकरणाची निगडित चौकशी करण्याकरिता का इक्बाल कासकरची कस्टडी मागितली आहे.
ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपासाकरिता आज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोन बिल्डरांनाही ईडीने समन्स बजावले असून त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागवण्यात आली आहेत. मुंबईत मंगळवारी छापेमारीनुकतेच ईडीने 10 ठिकाणी हे छापे टाकले होते. यामध्ये 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम, त्याची बहीण हसिना पारकर, कासकर आणि गँगस्टर छोटा शकील यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. छोटा शकील त्याच्या संबंधित असलेले सलीम फ्रूट याचादेखील ईडीने 9 तास चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. ईडीने सलीम सूट याच्याकडून काही महत्त्वाचे कागदपत्र देखील हस्तगत केले आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले असून 2 बिल्डरांना समन्स बजावले आहे.